गेल्या ११ वर्षांपासून विंडोज एक्सपी ही कम्प्युटर युझर्सचीआवडती ऑपरेटिंग सिस्टीम झाली आहे . त्यानंतर विंडोजच्यानव्या एडिशन्स आल्या असल्या तरी एक्सपी एवढी लोकप्रियता कुणालाही मिळालेली नाही . त्यामुळेच कदाचितमायक्रोसॉफ्ट , अॅडोबसह इतर सॉफ्टवेअर कंपन्यांनी आता आपल्या नव्या सॉफ्टवेअरच्या एडिशन्स एक्सपीलासपोर्ट करणार नाहीत असे जाहीर केले आहे . त्यामुळे एक्सपीच्या युझर्सला नजिकच्या भविष्यात नव्या ऑपरेटिंगसिस्टीमबरोबर जुळवून घ्यावे लागणार आहे .
गुगलनेही सर्व इंटरनेट एक्सप्लोअर धारकांना त्यांचा ब्राऊझर अपडेट करायला सांगितला आहे . इंटरनेटएक्सप्लोअरर १० येत्या २६ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार आहे . त्यानंतर म्हणजे १५ नोव्हेंबरपासूनइंटरनेट एक्सप्लोअर ८ किंवा त्यापूर्वीच्या एडिशन्सला गुगल अॅप्स सपोर्ट करणार नाहीत . त्यामुळे एक्सपीयुझर्सनी नवीन एक्सप्लोअरर इन्स्टॉल करायचा म्हटला तर मायक्रोसॉफ्ट ते करू देत नाहीय . इंटरनेटएक्सप्लोअररच्या नव्या एडिशन्स एक्सपीला सपोर्ट करणार नाही असे कंपनीने जाहीर करून टाकले आहे . यायुझर्सला फायरफॉक्स , ऑपेरा , क्रोम यासारखे ब्राऊझर इन्स्टॉल करण्याची सोय आहे .
पण फोटोशॉप युझर्सला तर ही सोय देखील उपलब्ध नाही . फोटोशॉपची सीएस ६ ही एक्सपीला सपोर्ट करणारीशेवटची व्हर्जन असेल असे अॅडोबने जाहीर केले आहे . कारण फोटोशॉपच्या आगामी व्हर्जनसाठी मॉडर्न हार्डवेअरग्राफिक्स लागणार असून ते एक्सपीमध्ये नाहीत , असे कंपनीचे प्रोडक्स मॅनेजर टॉम होगार्टी यांनी म्हटले आहे .विंडोजच्या नव्या एडिशन्समध्ये हे फीचर्स उपलब्ध आहेत . ग्राफीक कार्ड , ग्राफीक ड्रायव्हर्समुळे थ्रीडी , ब्लर गॅलरी, लाईटींग इफेक्ट यासारखे फीचर्स विंडोजच्या नव्या एडिशन्स युझर्सला वापरता येतील . फोटोशॉपची नवीएडिशन कधी दाखल होणार हे कंपनीने जाहीर केले नसले तरी आगामी एडिशन एक्सपीला सपोर्ट करणार नाही हेजाहीर करून ग्राहकांना ऑपरेटिंग सिस्टीम बदलण्यासाठी वेळ देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे . यापूर्वीचअडोब लाइटरुमच्या अपडेटेड एडिशन्स एक्सपीला सपोर्ट करत नाहीत .
नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ऑगस्टमध्ये विंडोज ७ च्या युझर्सच्या संख्येने विंडोज एक्सपीच्यायुझर्सला क्रॉस केले आहे . त्यामुळे आगामी काळात कराव्या लागणा - या बदलांची तयारी कम्प्युटर युझर्सनेही सुरूकेल्याचे दिसून येते आहे .

विंडोज एक्सपीचे पॅकअप
Reviewed by Sooraj Bagal
on
October 12, 2012
Rating:
No comments: