तीन महिन्यात ५ लाख टॅबलेटची विक्री : मायक्रोमॅक्स सर्वाधिक




स्वस्तातील टॅबलेट उपलब्ध झाल्याने भारतीय टॅबलेटवर अक्षरशः तुटून पडले असून तीन महिन्यात तब्बल लाखाहून अधिक टॅबलेटची खरेदी भारतीयांनी केली आहे एप्रिल ते जून या कालावधीत ही खरेदी झाली असूनगेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ ६७३ टक्क्यांची आहे 

सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालानुसार भारतीय टॅबलेट बाजारपेठेत मायक्रोमॅक्सचा सर्वाधिक म्हणजेच १८ .४ टक्के हिस्सा आहे त्यापाठोपाठ सॅमसंग १३ ३ टक्के आणि अॅपलचा १२ ३ टक्के क्रमांक लागतो .गेल्यावर्षी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या टॅबलेटची सरासरी किंमत २६ हजार होती यंदा ती निम्म्यावर म्हणजेच १३  हजार रुपयांवर आली आहे 

देशातील टॅबलेट बाजारपेठ अजूनही प्राथमिक अवस्थेत असली तरी नवनवीन पुरवठादार आणि त्यांच्या स्वस्तातील टॅबलेटमुळे देशात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे चालू वर्षाच्या तिस या तिमाहीतील विक्रीझालेले ४७ ४ टक्के टॅबलेट नव्या कंपन्यांचे होते त्यांचा प्रमुख फोकस शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या अॅप्सचा प्रसार करण्याचा आहे यावरून टॅबलेट विक्रेत्यांनी भारतीय युवकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होत असल्याचेसीएमआर टेलिकॉम प्रॅक्टीसचे प्रमुख विश्लेषक फैसल कावूसा यांनी सांगितले भविष्यात विंडोज आयओएस ,क्यूएनएक्स या ऑपरेटींग सिस्टीमवर आधारित टॅबलेटचे प्रमाण आयपॅड ३ आणि प्लेबुकच्या घसरणा या किमतीमुळे वाढणार असल्याचे ते म्हणाले .

तीन महिन्यात ५ लाख टॅबलेटची विक्री : मायक्रोमॅक्स सर्वाधिक तीन महिन्यात ५ लाख टॅबलेटची विक्री :  मायक्रोमॅक्स सर्वाधिक Reviewed by Sooraj Bagal on October 22, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.