‘अॅपल’पुढे गुगलची अँड्रॉइड सरस

जगातील सर्वांत मोठा मोबाइल प्लॅटफॉर्म कोणता तर अँड्रॉइड असे म्हणावे लागले या ओपन सोर्स मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्ममुळे इनोव्हेश करण्यास वाव मिळतअसून परिणामी मोबाइल फोनच्या किमतीही कमी होत आहेत यामुळे अॅपल कंपनीपुढे गुगल कंपनीच अँड्रॉइडही ऑपरेटिंग सिस्टिम वरचढ ठरत आहे 

जगात विविध ठिकाणी पाठविण्यात येत असलेल्या फोनमध्ये चार फोनमागे तीन फोन हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचे आहेत याबाबतची पुष्टीही आयडीसीने केली आहे २००८ मध्ये गुगल कंपनीने अँड्रॉइड ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केली तेव्हापासून स्मार्टफोनच्या विक्रीतही मोठी वाढ झाली असून ही ऑपरेटिंग सिस्टिमच या वाढीचे मुख्य इंजिन आहे लाँच झाल्यापासून प्रत्येक वर्षीअँड्रॉइड ही सिस्टिम वाढीच्या बाबतीत सरस ठरली आहे 

दुसऱ्या तिमाहीत टॅब्लेट बाजारपेठेत अॅपल कंपनीचा हिस्सा ६५ टक्के होता आणि आता तो ५० टक्क्यांपेक्षा किंचित जास्त आहे जागतिक पातळीवर विविध उत्पादकांकडून या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित डिव्हाइस तयार केली जात असून त्यांच्या किमतीतही विविधता आहे अँड्रॉइड स्मार्टफोनची निर्यात १३ ६ कोटी युनिटवर पोचली आहे गेल्या वर्षापेक्षा यात ९०टक्क्यांहून अधिक वाढ आहे .

 सॅमसंग गॅलेक्स एस३ या स्मार्टफोनने अॅपल कंपनीच्या आयफोन ४ एसला तिसऱ्या तिमाहीत मागे टाकत जगात सर्वाधिक विकला जाणारा फोन होण्याचा मान मिळाविला आहे असे पाहणी अहवालत नमूद केले आहे अॅपलपेक्षा इनोव्हेशनच्या बाबतीत अँड्रॉइडचा वेग अधिक आहे अँड्रॉइडकडून जोरदार प्रयत्न सरू असून अॅपल कंपनी बरीच मागे आहे असे गार्टरनचे म्हणणे आहे .
 अँड्रॉइड हा ओपन सोर्सप्लॅटफॉर्म असून वापरण्यास कोणतेही शुल्क द्यावे लागत नसल्याने अनेक कंपन्या या सिस्टिमचा आधार घेतडिव्हाइस डेव्हलप करीत आहेत याचा फायदा हा अँड्रॉइडला मार्केट वाढण्याच्या रूपाने होत आहे अँड्रॉइडप्लॅटफॉर्मवर अनेक पर्याय उपलब्ध असून 
बहुतेक पर्याय स्वस्तात मिळतात हा प्लॅटफॉर्म वापरण्याकडे लोकांचाकल वाढत आहे दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा असली तरी त्याचा फायदा हा प्रॉडक्ट रास्त किमतीला प्रसंगी स्वस्तात मिळण्याच्या रूपाने होत आहे हे नक्की 

‘अॅपल’पुढे गुगलची अँड्रॉइड सरस ‘अॅपल’पुढे गुगलची अँड्रॉइड सरस Reviewed by Sooraj Bagal on November 26, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.