एसएमएस होणार इतिहासजमा

sms.jpgदिवसभरात तुम्हाला मेसेजेस येण्याचे प्रमाण आणि तुम्ही मेसेजेस फॉरवर्ड करण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे तुमच्या लक्षात येईल स्मार्टफोनचा जन्म आणि सोशल नेटवर्किंग साईटचा मोबाइलवरील वाढता वापर यामुळे एसएमएसच्या वापरावर परिणाम होऊ लागला आहे 

बहुतांश स्मार्टफोन युजर हे मेसेंजर सर्व्हिसेसचा सर्वाधिक वापर करू लागले आहेत वायबारडॉटकॉम ,जक्सटर एसएमएस आय मेसेज व्हॉटसअॅप अशा विविध फ्री अॅप्समुळे टेक्स्ट मेसेजेस पाठवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण टेक्नोलॉजी एक्सपर्ट जेफ कागन यांनी मांडले आहे 

अमेरिकेतील मेजेस पाठवण्याच्या घटत्या प्रमाणाचा सर्वाधिक फटका जगातील तमाम मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्याना बसू लागला आहे मेसेजेससाठी इतर पर्याय वापर वापरल्यास मोबाइल कंपन्यांना आर्थिक फायदा होत नाही यामुळे अमेरिकेतील अनेक मोबाइल कंपन्यांनी आपल्या एसएमएस सुविधांचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे 

चेतन शर्मा या मोबाइल कन्सल्टंटने केलेल्या सर्व्हेत २०१२च्या तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेत टेक्स मेसेजेसमध्ये तब्बल तीन टक्के घट झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे २०१२च्या सुरुवातीला फोर्बनेही अशीच आकडेवारीप्रसिद्ध केली होती यामध्ये हाँगकाँग ऑस्ट्रेलिया ब्रिटन अमेरिका या देशांमधील आकडेवारी प्रसिद्ध करण्यातआली होती 

भारताच्या बाबतीत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली नसली तरी इथेही चित्र फारसे वेगळे नाही येथील मोबाइल कंपन्यांनीही पर्यायी सुविधांचा विचार सुरू केला आहे थ्रीजी तसेच लवकरच सुरू होणाऱ्या फोरजी या सुविधांमुळे टेक्स्ट मेसेजेस इतिहास जमा होतील अशी भीती व्यक्त होत आहे 

एसएमएस होणार इतिहासजमा एसएमएस होणार इतिहासजमा Reviewed by Sooraj Bagal on November 27, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.