संगणकाचा बादशहा मायकल डेल

Michael S. Dell
जे जन्मापासूनच वेगवान असतात त्यांची क्षमता इतरांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असते. बरोबरीच्या लोकांना मागे टाकून ते कमी वयात यशाचे शिखर गाठतात. फॉर्च्युन ५०० कंपनी डेलचे संस्थापक अध्यक्ष मायकल डेल हे अशांपैकीच एक.

रूढीवादी  यहुदी कुटुंबात जन्मलेले मायकल डेल हे लहानपणीच  इतके वेगवान होते की सातव्या वर्षीच त्यांनी हायस्कू लच्या बरोबरीची परीक्षा उत्तीर्ण केली. १५ व्या वर्षी अ‍ॅपल- २ हे कॉम्प्युटर पूर्णपणे उघडून ते पुन्हा जोडले. पार्ट टाइम जॉब करून कुमारवयातच ते कमावू लागले. त्यासोबत शेअर आणि धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले.

कॉम्प्युटरचे साम्राज्य उभे करण्यासाठी डेल यांना पैशांची आवश्यकता होती. पण कोणाकडे मदत मागण्याऐवजी स्वत:च पैसा उभा करण्याचे त्यांनी ठरवले. विद्यार्थीदशेत त्यांनी रेस्टॉरंटमध्ये सफाईचे काम केले. हायस्कूलमध्ये असताना ‘होस्टन पोस्ट’ या वृत्तपत्रात काम केले. एका वर्षात त्यांनी १८ हजार डॉलर म्हणजे ७ लाख ९६ हजार ३२० रुपये कमावले.

वडिलांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला पण डेल यांनी शिक्षण सोडले आणि कॉम्प्युटरला अपग्रेड करण्याच्या मागे लागले. त्यांचा आत्मविश्वास इतका जबरदस्त होता की त्यावेळची कॉम्प्युटर क्षेत्रातली मोठी कंपनी आयबीएमला मागे टाकण्याचे त्यांनी ठरवले. फोन कॉल्स, मेल आणि प्रत्यक्ष संपर्क करून त्यांनी कस्टमाइज्ड कॉम्प्युटर विक्रीचा व्यवसाय त्यांनी विस्तृत केला. डेल कॉम्प्युटरची त्यांनी शेयर मार्केटमध्ये नोंदणी केली. 

२७ व्या वर्षीच फॉर्च्यून-५०० कंपनीचे सीईओ बनले.  कॉम्पॅक कॉम्प्युटरसहित सर्व कॉम्प्युटरच्या विक्रीत सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. १९९६ मध्ये त्यांनी सर्व्हर लाँच केला. स्थायी संपत्तीत प्रवेश केला आणि होम इंटरटेन सिस्टीम आणि पर्सनल डिव्हाइससुद्धा बनवले.

४५ व्या वर्षी ते जगातले ४४ वे श्रीमंत व्यक्ती बनले. टेक्सासमधील त्यांचा बंगला हा जगातील १५ वा आलिशान बंगला ठरला.  

जे अतिद्रुत गतीने जातात त्यांना अपघात होतात हेही सत्य आहे. २०१० मध्ये गुंतवणूकदारांना अर्धवट माहिती देण्यामुळे आणि अकाऊंटिंगमध्ये घोळ केल्यामुळे त्यांना ४ मिलियन डॉलर (१७.५ कोटी) चा दंड भरावा लागला. त्यांनी स्थापन केलेली मायकल-सुजॅन फाऊंडेशन जगभरातल्या विशेषत: भारत आणि अमेरिकन विद्यार्थ्याच्या शिक्षण-आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते
.


संगणकाचा बादशहा मायकल डेल संगणकाचा बादशहा मायकल डेल Reviewed by Sooraj Bagal on November 11, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.