ऑपरेटिंग सिस्टीम
उबूंटू आणि फेडेरासह लिनक्सच्या बहुतांश ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे पेन ड्राइव्हवर चालू शकतात . अगदी तुमच्या हार्डडिस्कवर इन्स्टॉल केल्याप्रमाणे ही सिस्टीम तुम्हाला वापरता येते . त्यात वेब ब्राऊझिंग , वर्ड - एक्सेल फाइल्स एडिट करता येतात पण स्पीड फक्त थोडा कमी असतो . याचा एक फायदा म्हणजे , तुम्ही कम्प्युटर खिशात घेऊन फिरू शकता . सध्या विंडोज आणि मॅकचा असा वापर करता येत नाही पण मायक्रोसॉफ्ट या दृष्टीने विचार करत आहे .
पोर्टेबल प्रोग्रॅम्स
पोर्टेबल ऑपरेटिंग सिस्टीमप्रमाणे काही पोर्टेबल सॉफ्टवेअर असतात . ती थेट पेन ड्राइव्हवर वापरता येतात .फायरफॉक्स , क्रोम हे ब्राऊझर , वर्डवेब हे डिक्शनरी सॉफ्टवेअर , इरफान व्ह्यू हे इमेज एडिटींग सॉफ्टवेअरयासारखी अनेक सॉफ्टवेअर पोर्टेबल स्वरूपात पेनड्राइव्हमधून वापरता येतात . त्यामुळे अॅडमिनिस्ट्रेटरची परवानगी नसतानाही तुम्ही गरजेच्यावेळी हे सॉफ्टवेअर वापरू शकता . www.portableapps.com, www.portablefreeware.com,
www.pendriveapps.com या वेबसाइटवर तुम्हाला पोर्टेबल प्रोग्रॅम मिळू शकतील .
फक्त डिलीट करू नका
विंडोजमध्ये तुम्ही डिलीट केलेली फाइल रिसायलकल बिन मध्ये जाते . त्यामुळे चुकून डिलीट झालेली फाइल पुन्हा मिळवण्याची संधी तुमच्यासमोर कायम असते . पण पेन ड्राइव्हमध्ये ही सोय नाही . पण आयबिन हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरत असाल तर तो प्रॉब्लेमही सुटला . आयबिन हे पोर्टेबल रिसायल बिन असून ते डाऊनलोड करून पेन ड्राइव्हमध्ये एक्स्ट्रॅक्ट केल्यास पुढील वेळेपासून ते आपोआप काम सुरू करते . एखादी फाइल तुम्ही डिलीट करण्याचा प्रयत्न केल्यास ती आयबिनमध्ये ट्रान्सफर करायची का असा प्रश्न हे सॉफ्टवेअर विचारते ,परवानगी दिल्यावर तुमची फाइल थेट आयबिनमध्ये जाते . सध्याच्या काळात पेन ड्राइव्हचे आकार वाढत असल्याने तुम्ही आयबिन वापरू शकता आणि जागा कमी पडल्यास त्यातील फाइल्स डिलीट करू शकता .
व्हायरसपासून सुरक्षा
एखाद्या कम्प्युटरमधील व्हायरस तुमच्या पेन ड्राइव्हमध्ये आणि नंतर घरच्या कम्प्युटरमध्ये पोहोचू शकतो .त्यामुळे तुमच्या पेन ड्राइव्हला केवळ रिड ओन्ली मोडमध्ये ठेवणे योग्य . युएसबी राइट प्रोटेक्टर हे सॉफ्टवेअर
www.gaijin.at/dlusbwp.-php याठिकाणाहून डाऊनलोड करून तुम्ही वापरू शकता . पेन ड्राइव्हमध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यावर ते ऑन किंवा ऑफ करून तुम्ही पेन ड्राइव्हचा रिड ओन्डी मोड ऑन / ऑफ करू शकता . पण हे सॉफ्टवेअर ऑन / ऑफ केल्यावर पेन ड्राइव्ह बाहेर काढून पुन्हा जोडावा लागतो . तेव्हाच सॉफ्टवेअर काम करते .
पासवर्ड सुरक्षा
तुमच्या पेनड्राइव्हमधील काही डेटा इतरांनी वापरू नये अशी तुमची इच्छा असेल तर Rohos Mini Drive Portable (www.rohos.com/products/rohos-minidrive ) हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही तुमच्या पेनड्राइव्हमध्ये छुपे हिस्से तयार करू शकतात . या पार्टिशनला पासवर्ड सुरक्षाही देता येते . संपूर्ण पेन ड्राइव्हला पासवर्ड प्रोटेक्शन द्यायचे असेल तर
Cryptainer LE (www.cypherix.com/cryptainer_le_download_center.htm). या सॉफ्टवेअरचा वापर करता येईल .
अॅटोमॅटिक बॅकअप
USB Flash Copy (www.usbflashcopy.com) हे सॉफ्टवेअर तुम्हाला पेन ड्राइव्हचा अॅटोमॅटिक बॅक अप घेण्याची सुविधा देते . यात तुम्ही फाइलचा प्रकार वगैरेही ठरवून फक्त त्याचा बॅकअप घेऊ शकता . यामध्ये तुम्हाला प्रोफाइल तयार करण्याचीही सुविधा आहे . त्यामुळे घरच्यासाठी आणि ऑफिससाठी स्वतंत्र प्रोफाइल तयार करून ठेवू शकता .
पोर्टेबल ड्राइव्ह :: पेन ड्राइव्ह
Reviewed by Sooraj Bagal
on
November 05, 2012
Rating:
Hey! I just wanted to ask if you ever have any problems with hackers?
ReplyDeleteMy last blg (wordpress) was hacked and I ended up losing many
months of hard work due tto no data backup. Do you have any methods to prevent hackers?
Use Two Step Verification on Every online account you have
Delete