वेगाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या जगात रोज नवनवीन सर्व्हर , प्रोसेसर , तंत्रज्ञान यामुळे कम्प्युटर वेबसाइटचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे . सोबतच सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे . ऑनलाइन अॅक्टिव्हिटी अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी कंपन्या नवनवीन प्रणालीचा उपयोग करत आहेत . ही सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या फेसबुकचा वेग मात्र नव्या प्रणालीमुळे कमी होणार आहे .
युजर्सचे अकाऊंट अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी फेसबुक सुरुवातीला उत्तर अमेरिकेतील युजर्सला स्थलांतरितकरणार असून नंतर जगभरातील इतर ठिकाणच्या युजर्सला ही सुविधा दिला जाणार आहे . त्याठिकाणाहून फेसबुक https या http पेक्षा अधिक सुरक्षित कनेक्शनवर काम करणार आहे . त्यामुळे फेसबुकच्या वेब अॅड्रेसच्या अगदी सुरुवातीला http ऐवजी https दिसणार आहे . यातील s म्हणजे सिक्युअर . प्रामुख्याने बँकींग , ऑनलाइन शॉपिंग कंपन्या क्रेडीट कार्ड किंवा पासवर्डची माहिती मागताना अशाप्रकारच्या कनेक्शनचा वापर करतात .
फेसबुकच्या सर्व १ अब्जाहून अधिक युजर्ससाठी हेच कनेक्शन वापरले जाणार आहे . जानेवारी २०११ मध्ये फेसबुकने या स्थलांतरणाची सुरुवात केली . आतापर्यंत काही ठिकाणी ही सुविधा पर्यायी उपलब्ध होती .भारतातही इंटरनेट एक्सप्लोअरर सारख्या ब्राऊझरवर http तर मोझिलावर https कनेक्शन उपलब्ध होते . मात्र लवकरच सर्वांना ती बंधनकारक केली जाणार आहे . त्यामुळे अधिक सुरक्षित होण्याबरोबरच फेसबुक सुरक्षितहोणार आहे . वेग कमी होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी फेसबुककडून प्रयत्न केले जात असले तरी https वर ट्रान्सफर होण्यासाठीची प्रक्रिया थांबवणार नसल्याचे फेसबुकचे फ्रेडरीक वूलन्स यांनी स्पष्ट केले आहे .
या बदलाचा एक फायदा म्हणजे फेसबुक अकाऊंट अधिक सुरक्षित तर होईलच सोबत हॅकर्सपासूनही त्यांचे संरक्षण होईल . कारण https मध्ये सर्व डेटा एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये असणार आहे . त्यामुळे वायफाय कनेक्शन वापरताना किंवा फेसबुक लॉग आऊट न करता कम्प्युटर बंद केल्यावरही अकाऊंटची सुरक्षा कायम राहणार आहे . या स्थलांतरणाचा आणखी एक फायदा म्हणजे ओळख नसलेल्या व्यक्तींनाही आता फेसबुक गेम खेळण्यासाठी आमंत्रित करता येईल . त्यामुळे फेसबुकच्या गेमिंगचा महसूल वाढणार आहे .
जानेवारी २०१० मध्ये जीमेलने सर्व युजर्सला https वर स्थलांतरित केले होते . पुढे जुलै २०१० मध्ये वेब ब्राऊझिंगच्या स्पीडमध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचे जीमेलने म्हटले होते . हॉटमेल आणि ट्विटरवरही पूर्वीपासून https कनेक्शन वापरले जात आहे .
फेसबुक सुरक्षित पण स्लो होणार
Reviewed by Sooraj Bagal
on
November 28, 2012
Rating:
No comments: