असा वापरा अँड्रॉइड फोन

नॉन मार्केट अॅप ओपन करण्यासाठी 
काही फोन वगळता बहुतांश अँड्रॉइड फोनमध्ये आपल्यालानॉन मार्केट अॅप ओपन करता येऊ शकतात म्हणजे आपण थर्ड पार्टी अॅप्स डाऊनलोड करू शकतो जसे की अमेझॉन अॅप स्टोअर किंवा ऑनलाइन अॅप्समधून आपण आपल्याला पाहिजे ते अॅप्स डाऊनलोड करू शकतो हे फीचर वापरण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन अॅप्लिकेशन सेटिंग्जमध्ये जा आणि अननोन सोर्स समोरील चौकनात टिक मार्क कराहे केल्यावर तुम्हाला विविध अॅप स्टोअरमधील अॅप्स डाऊनलोड करता येणं शक्य होणार आहे 

अॅप बंद करा 
अँड्रॉइड फोनमध्ये आपले अॅप्स सतत सुरू असतात .ज्यावेळेस आपण त्याचा वापर करत नसू त्यावेळी हे अॅप बंद केले तर आपली बॅटरी जास्तवेळ वापरता येऊ शकेल हे अॅप्स बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा त्यानंतर रनिंग सर्व्हिसेसमध्ये लिस्ट व्ह्यू करा मग जे अॅप्स तुम्हाला नको असतील त्या अॅप्सच्या पुढे स्टॉप करून अॅप्लिकेशन बंद करा 

अॅनिमेटेड वॉलपेपर वापरू नका 
अॅनिमेशन असलेले वॉलपेपर खूप छान दिसतात ते एन्जॉयही करता येतात मात्र त्यामुळे आपल्या मोबाइलची बॅटरी खूप जास्त खर्च होते अशावेळी तुम्ही अॅनिमेशनच्या वॉलपेपरचा वापर करू नका हे वॉलपेपर्स बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये डिस्प्लेमध्ये जा आणि नंतर अॅनिमेशन्समध्ये जाऊन ऑल 
अॅनिमेशन्सवर टिक करा 
स्पेशन कॅरॅक्टर म्हणजे बॅक स्लॅश अॅट द रेट अशा किजचा क्विक अॅक्सेस पाहिजे असेल तर स्पेसबारवर टॅप करा आणि होल्ड करा ते केल्यावर आपण नेहमी वापरत असलेल्या कॅरेक्टर्सचा बॉक्स पॉप अप करत राहतो 

गुगल वॉइस नंबर 
कोणत्याही अँड्रॉइड फोनवर गुगल वॉइस वापरता येऊ शकतील यामध्ये तुम्ही तुमचा डिफॉल्ट नंबर सेव्ह करूशकता म्हणजे आपण त्या व्यक्तीचे नाव घेतले की फोन लागतो यासाठी तुम्हाला वॉइस अॅप डाऊनलोड करावालागेल हे अॅप तुमचा मोबाइल नंबर व्हेरीफाय करतो आणि मगच तुम्हाला ते अॅप वापरता येऊ शकते 

सर्व अॅप फोल्डरमध्ये ठेवा 
तुमच्या होम स्क्रीनवर अनेकदा अॅप्सची गर्दी दिसते हे टाळायचे असेल तर तुम्ही सर्व अॅप्स एका फोल्डरमध्ये सेव्हकरा यासाठी तुमच्या मोबाइलच्या होमस्क्रीनवर टॅप करून होल्ड करा यानंतर एक फोल्डर तयार करा आणिमग त्यात सर्व अॅप्स तुम्हाला ड्रॅग करता येऊ शकतील 

असा वापरा अँड्रॉइड फोन असा वापरा अँड्रॉइड फोन Reviewed by Sooraj Bagal on January 15, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.