टच-स्क्रीनद्वारे डेस्कटॉपला संजीवनी?

desktop-pen.jpgअतिशय दिमाखात विंडोज ८ लाँच झाली. त्यात टचस्क्रीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने जुन्या चांगल्या स्थितीतील कम्प्युटरवर विंडोज ८ च्या या फीचरचा उपयोग नव्हता आणि या फीचरशिवाय विंडोज ८ वापरणे म्हणजे हिरो हिरॉइन नसलेला चित्रपट पाहणे. ग्राहकांची ही तक्रार लक्षात घेऊन कम्प्युटर कंपन्यांनी नवे डिजिटल पेन तयार केले आहे. मॉनिटरचे स्क्रीन त्यामुळे टच स्क्रीन 'सुविधा वापरण्याजोगे होणार आहेत. टॅबलेटच्या जमान्यात डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटरना हा शोध नवसंजीवनी देईल का हे आगामी काळच ठरवेल. या पेनमुळे विंडोज ८ 'वरील वेगवेगळ्या कमांडना टच स्क्रीन द्वारे स्वाइप करण्याची गंमत आता प्रत्येकालाच अनुभवता येईल. डिजिटल पेन कॉस्ट इफेक्टिव्ह ही ठरणार आहे. नवा टच स्क्रीनचा मॉनिटर घेण्यापेक्षा हे डिजिटल पेन घेणे केव्हाही फायद्याचे ठरणार आहे. 

डिजिटल पेन काय आहे 
हे केवळ ई- फन आहे. कॅलिफोर्नियामधील वेस्ट कोव्हिया या कंपनीने हे कॉर्डलेस पेन तयार केला आहे. अॅपेन टच ८ असे त्याचे नाव आहे. एका अॅटॅचमेंटद्वारे कम्प्युटरच्या यूएसबी पोर्टमध्ये घालून याचा वापर करता येईल. 

हे कसे काम करते 
पेनला जोडण्यात आलेली अॅटॅचमेंट इन्फ्रारेड आणि अल्ट्रासॉनिक सिग्नल रिसीव्ह करण्याचे काम करते. पेनमधून इन्फ्रारेड किरण बाहेर पडतात. रिसीव्हर हा सिग्नल कम्प्युटरपर्यंत पोहोचवतो आणि टच स्क्रीनने संबंधित क्रिया करतो तशी अगदी नेमकी स्थिती येथे तयार होते. हे पेन घड्याळाला जे सेल वापरतात त्यावर चालते आणि ते पाचशे तास वापरता येते आणि नंतर बदलताही येते. 

सारे काही डेस्कटॉप कम्प्युटरसाठी 
टॅबलेटच्या जमान्यात डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटरचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी कंपनीकडून असे प्रयत्न करण्यात येत आहेत. या पेनमुळे डेस्कटॉप आणि लॅपटॉप कम्प्युटरचाही वापर टच स्क्रीनसारखा करता येणार आहे. 

बाजारात कधी येणार 
या वर्षी मार्च महिन्याअखेरीस उत्तर अमेरिकेत हे पेन बाजारात येईल. त्याची किंमत ८० डॉलर्स असेल.

टच-स्क्रीनद्वारे डेस्कटॉपला संजीवनी?  टच-स्क्रीनद्वारे डेस्कटॉपला संजीवनी? Reviewed by Sooraj Bagal on January 16, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.