टीव्हीचा मेकओव्हर

तुमचा टीव्ही तुम्हाला इडियट बॉक्स वाटतो का वाटत असेल तर त्याला तुम्ही आता स्मार्ट बॉक्स बनवू शकता. यासाठी थोडा खर्च करावा लागेल पण या टीव्हीवर इंटरनेटचा वापर करू शकाल. इंटरनेट टीव्हींची सध्या बाजारात खूप चलती आहे. यामुळे तुमच्या टीव्हीवर यू-ट्यूब फेसबुक ट्विटर आदी इंटरनेटवर वापरता येणाऱ्या सुविधा वापरू शकतात. पण समजा तुम्ही नुकताच नवा टीव्ही घेतलाय यामुळे तो बदलून हा नवा इंटरनेट टीव्ही घेण्याची इच्छा होत नाहीये पण त्याच्यातील सर्व फिचर्सपण पाहिजे आहेत. मग अशा वेळी काय कराल यावरही आता उपाय निघाले आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या सध्याच्या टीव्हीमधील हार्डवेअरमध्ये बदल करावे लागतील. 
टीव्हीचा झाला कम्प्युटर 
तुमच्या टीव्हीवर इंटरनेटचा पुरेपूर वापर करायचा असेल तर विविध कंपन्यांनी चांगली अत्याधुनिक उपकरणे बाजारात आणली आहेत. यामध्ये तुम्ही मॉनिटर म्हणून टीव्हीचा वापर करू शकाल. यातील केवळ एका 'एचडीएमआय केबलमुळे तुम्ही एचडीचा अनुभव घेऊ शकता. मग तुम्ही वायरलेस की-बोर्डच्या सहाय्याने याचा वापर अधिक चांगला करू शकता. पीसी एक्सबॉक्स ३६० किंवा पीएस ३ यापैकी कोणताही डिव्हाइस टीव्हीला जोडले की पाहिजे ते सॉफ्टवेअर तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता. 

वायरलेस स्वप्नपूर्ती 
एचडीएमआय केबलच्या सहाय्याने पूर्णत: एचडीची मजा घेता येणार नाही. लास वेगास इथे पार पडलेल्या कन्झ्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये यंदा इंटेल ने वाय-डी अर्थात वायरलेस डिस्प्ले टेक्नॉलॉजी सादर केली होती. याद्वारे पूर्ण १०८० पिक्सलच्या एचडी व्हीडिओचा अनुभव घेता येतो. यासाठी केवळ एक सॉफ्टवेअर आणि एका अॅडाप्टरची गरज असते. 

गेम कॉन्सोल 
बाजारात कम्प्युटरसाठी उपलब्ध असलेले सर्व गेमबॉक्स टीव्हीला उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये निटॅन्डो डब्ल्यूआयआय प्लेस्टेशन ३ आणि एक्सबॉक्स ३६० या सर्वांना इंटरनेट कनेक्टिविटी आणि गेम्स कनेक्शन अशा दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. एक्सबॉक्समध्ये फेसबुक आणि ट्विटर हे दोन अॅप्लिकेशन्सही उपलब्ध आहेत. 

इंटरनेट कनेक्टेड डिव्हाइस 
तुमच्या टीव्हीवर इंटरनेट सुरू करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो. यासाठी केवळ तुम्हाला इंटरनेट पुरवणारा एचडी मीडिया बॉक्स टीव्हीला जोडावा लागतो. सध्या बाजारात 

*******>>>>>>>डब्ल्यूडी टीव्ही लाइव्ह सीगेट फ्री एजंट थिएटर किंवा टीव्ही लाइव्ह हब , Micromax USB Smart Stick , Apple, Tv, Akai smart box, mitashi box,google tv, etc. 

 हे सर्व सध्या बाजारात उपलब्ध आहेत आणि यांची चलतीही आहे. मात्र यामध्ये एक अडचण आहे. ती म्हणजे या माध्यमातून आपण इतर सॉफ्टवेअर अॅड करू शकत नाहीत. यामध्ये उपलब्ध असलेले फेसबुक ट्विटर यू-ट्युब इंटरनेट रेडिओ आणि व्हीडिओ स्ट्रीमिंग याच सोयी आपण वापरू शकतो. यात एक फायदा आहे तो म्हणजे आपल्या टीव्हीच्या हार्डवेअरमध्ये कोणताही बदल करण्याची गरज पडत नाही. याला आपण यूएसबीही जोडू शकतो. यामुळे पेनड्राइव्हवरील फाइल्स आपण टीव्हीवर पाहू शकतो. 


टीव्हीचा मेकओव्हर टीव्हीचा मेकओव्हर Reviewed by Sooraj Bagal on January 26, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.