ऑपरेटिंग सिस्टिमधील संधी
व्यवसायाच्या संधी खुणावत असल्याने फायरफॉक्स आणि उबंटू यांनीही या क्षेत्रात पुन्हा प्रवेश केला आहे. मोबाइल ऑपेरटिंगच्या बाजारपेठेत आघाडीवर अ-सलेल्या आयओएस आणि अँड्रॉइडला यामुळे स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनने हा कम्प्युटरसारखे काम करावे , ही संकल्पना वापरून ' उबंटू ' आपले मार्केटिंग करीत आहे. त्यामुळे कम्प्युटरसारखाच अनुभव सर्व प्लॅटफॉर्मवर एकसारख्या पद्धतीने मिळण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. ' मोझिला ' ने फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टिमसाठी लो-एंड फोनना उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थात , यात स्मार्टफोनचा विचार कंपनीने केलेला आहे. कम्प्युटरवर एखादी वेबसाइट पाहण्याचा अनुभव मिळतो , तसाच अनुभव स्मार्टफोन मिळावा यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे.
' उबंटू ' ने अॅप्लिकेशन डेव्हलपर्सना मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी अॅप डेव्हलप करण्याचे निमंत्रण दिले आहे. यासाठी वेबकिटचा वापर करण्यात येणार आहे. मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये दीर्घकालीन उद्दिष्ट घेऊन ' कॅनोकल ' ही कंपनी उतरत आहे. त्यामुळे ' उबंटू ' या सिस्टीमसाठी हळूहळू पावले टाकीत कंपनी उद्दिष्टाच्या दिशेने वाटचार करती आहे.
' मोझिला ' च्या म्हणण्यानुसार अँड्रॉइड हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म नाही. मात्र , असा दावा गुगल कंपनीकडून केला जातो. बहुतेक डिझाइनचे निर्णय हे गुगल कंपनीने घेतलेले असतात आणि ते डेव्हलपर्सपुढे ठेवले जातात. त्यामुळेच' मोझिला ' ची फायरफॉक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम या सगळ्यांना एक पर्याय ठरेल. कंपनीने यासंबंधीचे पहिले प्रारूप नुकत्याच झालेल्या ' कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो ' मध्ये ' झेटीई ' या कंपनीच्या मोबाइलवर दाखविले. फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलपमेंटच्या अखेरच्या टप्प्यात असून , पुढील काही आठवड्यांतच ती बाजारपेठेत उपलब्ध होईल. या दोन नव्या ऑपरेटिंग सिस्टिममुळे स्मार्टफोन युजरनी नवा आणि आणखी चांगला वेब अनुभव मिळण्याची अपेक्षा करायला हरकत नाही.
अँड्रॉइडला दोन नवे पर्याय? फायरफॉक्स आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम
Reviewed by Sooraj Bagal
on
January 27, 2013
Rating:

No comments: