'जी-मेल'ने केला प्रायव्हसीचा भंग? ' गुगल ' ची खेळी संशयास्पद.

यूजरने पाठविलेला (सेन्ट) किंवा स्वीकारलेला (इनबॉक्स) प्रत्येक मेल गुगलतर्फे वाचला जातो असा खळबळजनक दावा सॉफ्टवेअरनिर्मात्या मायक्रोसॉफ्ट ने केला आहे. 

डोंट गेट स्क्रूगल्ड बाय जी-मेल या मोहिमेद्वारा गुगलचा प्रायव्हसी भंगाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याचा दावाहीमायक्रोसॉफ्ट ने केला आहे. प्रत्येक मेलला जोडण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून गुगल हे उद्योग करीत असल्याचा मायक्रोसॉफ्ट चा आरोप आहे. त्यामुळे जी-मेल च्याऐवजी आपली आउटलूक डॉट कॉम ही सेवा वापरण्याचा सल्ला मायक्रोसॉफ्ट ने दिला आहे. 

जी-मेलवरील बहुतांश जाहिराती या ओपन मेलमधील कंटेन्टच्या बाजूला वापरण्यात आलेल्या असतात ,' असे स्पष्टीकरण गुगलच्या वेबसाइटवर देण्यात आले आहे. या स्पष्टीकरणाचा आधार घेत गुगलच्या स्क्रूगल्ड डॉट कॉमया साइटचा भांडाफोडही केल्याचे मायक्रोसॉफ्ट ने म्हटले आहे. 

अशी झाले गुपित उघड... 

एका जी-मेल युजरने आपल्याला नवऱ्यापासून घटस्फोट हवा असल्याचा मेल मैत्रिणीला केला. त्यानंतर काही दिवसांतच तिला घटस्फोट स्पेशालिस्ट असणाऱ्या वकिलाची जाहिरात लिंक असलेली मेल आली. या उदाहरणावरून गुगल यूजरचे वैयक्तिक मेल तपासत असल्याचा आरोप मायक्रोसॉफ्ट ने केला आहे. या शिवाय सध्या गुगलवर यूजरच्या प्रायव्हसी भंगाचे सहा गुन्हे दाखल असल्याकडे मायक्रोसॉफ्ट ने लक्ष वेधले आहे. 

मायक्रोसॉफ्ट चे दावे 

आपल्या मेल अकाउंटचा गुगल कडून होत असलेल्या गैरवापराबाबत ७० टक्के अमेरिकन जी-मेल यूजरना थांगपत्ता नाही. 

पर्सनल ई-मेल च्या माध्यमातून जाहिराती विकण्याची गुगल ची खेळी संशयास्पद. 

ही माहिती समजल्यानंतर ८८ टक्के यूजरनी केला गुगल ला टाटा. 

'जी-मेल'ने केला प्रायव्हसीचा भंग? ' गुगल ' ची खेळी संशयास्पद. 'जी-मेल'ने केला प्रायव्हसीचा भंग?  ' गुगल ' ची खेळी संशयास्पद. Reviewed by Sooraj Bagal on February 14, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.