गेल्या काही वर्षांत मोझिला , ओपेरा , क्रोम यासारखे अनेकब्राऊझर बाजारात आले . त्यातील सोयीसुविधांमुळे इंटरनेट एक्सप्लोअररकडे ( आयई ) काही अंशी दुर्लक्ष झाले .त्यामुळे आयईमध्ये स्वतः तयार केलेल्या वेबसाइटचे सर्व फीचर्स योग्यरितीने चालतील याची खात्री डेव्हलपर्सला नसते . त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने ' मॉडर्न . आयई ' ही वेबसाइट तयार केली आहे .
या वेबसाइटवर वेबसाइट टेस्टिंगचे सर्व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत . त्यात नव्याजुन्या सर्व आयईमध्ये चालू शकतील अशा वेबसाइटचे टेस्टिंग करता येते . यात वेबसाइट टेस्टिंगचे टूल मोफत देण्यात आले आहे .वेबसाइटच्या एचटीएमएल कोडिंगचे पूर्ण स्कॅनिंग यात होते आणि नव्याजुन्या आयईवर कुठे काही प्रॉब्लेमयेण्याची शक्यता वाटली ; तर लगेच अॅलर्ट दिला जातो .
केवळ अॅलर्ट देऊनच ही वेबसाइट थांबत नाही , तर कशापद्धतीने कोड लिहिला म्हणजे त्याला प्रॉब्लेम येणारनाही हे देखील सुचविते . यात मोबाइल , टॅब , मोठे मॉनिटर यावर वेबसाइट योग्य रितीने कशी दिसेल यासाठीहीमदत केली जाते . विंडोज ८ वर वेबसाइट व्यवस्थित चालावी यासाठीही याठिकाणी मदत केली जाते . यावेबसाइटवर नव्या सिस्टीमसाठी आवश्यक कोडिंगबाबत १०० टक्के मार्गदर्शन केले जात नसले तरी , सध्याच्याकोडिंगमधील ८० - ९० टक्के कमतरता दूर करण्यासाठी मदत केली जाते , असे आयईचे जनरल मॅनेजर रायनगाविन म्हणतात . या व्यतिरिक्त साइटच्या चेकिंगसाठी मायक्रोसॉफ्टने दोन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात साइटची व्हर्च्युअल मशीनवर टेस्टिंग करण्याची सोय आहे .
Link to Click Here >>>>> modern.ie
म्हणजे नवीन साइट विंडोज एक्सपी असणाऱ्या मशिनमध्ये आयई ६ वर , विस्टाच्या मशीनमध्ये आयई ७ वर ,विंडोज ८च्या मशीनवर आयई ८ मध्ये तुमची वेबसाइट कशी काम करेल हे ती ऑपरेटिंग सिस्टीम , सॉफ्टवेअरइन्स्टॉल न करताही चेक करता येऊ शकते . सध्या तरी विंडोज आधारित मशिनवर ही सुविधा उपलब्ध असून ,लवकरच लिनक्स आणि ओएसवर चालणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
मायक्रोसॉफ्ट एवढ्यावरच थांबलेली नाही तर , वेबसाइटची अधिकाधिक टेस्टिंग करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्टने ब्राऊझर स्टॅकसोबत करार केला असून कंपनीच्या सुविधांचा तीन महिने मोफत लाभ घेता येणार आहे . सोबतच वेबसाइट डेव्हलपर्ससाठी विविध टिप्सही याठिकाणी देण्यात आल्या आहेत .त्यामुळे वेब डेव्हलपर्सच्या भविष्यातील समस्या कमी होतील , अशी आशा आहे .

वेबसाइट टेस्टिंग आणखी सोपे : मॉडर्न . आयई
Reviewed by Sooraj Bagal
on
February 10, 2013
Rating:
No comments: