कम्प्युटर गेम्सनी गेमिंग मार्केटमध्ये झालेल्या भरगच्च उलाढालीनंतर आता टॅबलेट्स आणि स्मार्ट फोनमध्ये गेमिंगची लाट सुरू झाली. सरत्या वर्षांत या गेम्सनी मोबाइल मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. याचा इतका प्रभाव पडत गेला की प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये अँग्रीबर्ड, निंजांजप यासारखे गेम्स दिसू लागले. हे आणि यासारखे अनेक हिट गेम्स नव्या वर्षात आपला नवा अवतार घेऊन येत आहेत. याविषयी...
अॅन्ड्रोंइडसाथी काही खास गेम्सची यादी
टेंपल रन 1 , 2
अनेक सिनेमांमध्ये हिरो काहीतरी खजिना शोधताना दिसतो. त्यामध्ये अनेक भुलभुलय्या आणि जाळ्या असतात. अनेक अडथळे असतात. पण त्या सगळ्यातून स्वतःला वाचवत नायकाला खजिना मिळवायचा असतो. इथे तुम्ही एक शापित मूर्ती मंदिरातून चोरी केलीये. आता जीव वाचवून पळत सुटला आहात. दुष्ट राक्षस, माकड तुमच्या मागावर आहेत. जुन्या मंदिराच्या खालून पळायचे आहे. मध्ये भिंती, डोंगर, कडे-कपाऱ्या आहेत. फोनवर नुसतं टच करुन तुम्ही वळू शकता, उड्या मारू शकता, घसरू शकता.
ह्या गेमला उदंड प्रतिसाद लाभला असून अवघ्या काही दिवसातच 20 लाखांवर लोकांनी डाऊनलोड केली आहे
Download Google प्ले स्टोर : Temple Run 2
एनएफएस(नीड फॉर स्पीड) मोस्ट वॉन्टेड२
हा गेम पीसी, प्ले स्टेशन ३, प्ले स्टेशन विटा, आइ ओएस, अँड्रॉइड आणि एक्स बॉक्स ३६०साठी आहे. खरे पाहता एनएफएस हे नावच खूप आहे. सिंगल-प्लेअर सेक्शनमध्ये एक १० रेसर्सची ब्लॅकलिस्ट आहे, एकदम ओरिजिनल मोस्ट वाँटेडच्या सिंगल-प्लेअर सेक्शनसारखे. मात्र यात आधीच्या गेममधील रॉकपोर्ट शहरातील आरपीडी या पोलिसांच्या गाड्या नसून ली- हार्वेसिटीचे एफसीपीडी हे पोलिस आहेत. गेममध्ये स्टार्ट पॉइण्ट व एण्ड पॉइण्ट दिलाय. प्लेअर स्वतः हवा तो रस्ता निवडू शकतो. ' द वाइल्डेस्ट सिलेक्शन ऑफ कार्स येट ' ही अप्रतिम स्तुती या गेममधील गाड्यांना मिळाली आहे.
व्हेअर इज माय वॉटर
हा गेम डिस्नेने तयार केलाय. स्वेंपी नावाच्या एका मगरीला आंघोळीसाठी पाणी पोहोचवणे हा या गेमचा मुख्य उद्देश आहे. ही शहराच्या खाली राहाते. तिला एकटीला नव्हे तर तिच्या रबरी बदकांनाही आंघोळ करायचीये. त्यामुळे स्वेंपीच्या आंघोळीसाठी वस्तू जमा करायच्या आहेत. मग या वस्तू जमा करा आणि चॅलेंज पूर्ण करून बोनस लेव्हल्स मिळवा. हा एक पझल गेम असून यात आपल्याला आंघोळ करणाऱ्या मगरीपर्यन्त पाण्याचा प्रवाह न्यायचाय. हा गेम तसा सोपा आहे. त्यामध्ये अनेक टप्पे आहेत.
निंजा जंप
हा एकदम सोप्पा गेम आहे. यामध्ये तुम्ही एक छोटेसे निंजा आहात, जो एक उंच इमारत चढण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्यामध्ये अनेक अडथळे आहेत. खारी, पक्षी आणि बाकीच्या अडथळ्यांना टाळून तुम्हाला जास्तीतजास्त उंच चढायचंय. जितकं उंच पोहोचाल तितकी कठीणपणाची लेव्हलही वाढत जाईल. इतर गेम्सप्रमाणे यात अनेक टप्पे नसून एकच टप्पा आहे आणि तोच कठीण कठीण होत जातो. हा गेम गुगल मार्केटमध्ये मोफत मिळतो. ९ एमबी साइज़ असलेला हा गेम कमी मेमरी असणाऱ्या फोन्ससाठी मात्र एक त्रासदायक बाब आहे.
कट द रोप
झेपटोलॅब या कंपनीने हा गेम तयार केलाय. याला ब्रिटीश अॅकॅडमी व्हिडिओ गेम्स अॅवॉर्ड मिळालंय. ओमनोम या कँडीखाऊ राक्षसाला कँडी पुरवत राहाणं हा या गेमचा उद्देश आहे. कँडी लावलेल्या दोऱ्यावरुन बोटं फिरवून त्या दोऱ्या तोडायच्या आहेत आणि कँडी ओमनोमपर्यंत पोहोचवायच्या आहेत. पण धागे तोडताना स्टार्स अर्थात पॉइंटस घ्यायला विसरायचं नाही. पण या गेममध्ये काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हवा. मध्ये काटे असतील. या काट्यांपासून कँडी लांब ठेवायची. काट्यांना कँडी टच झाली तर लेव्हल रिस्टार्ट होते. हवेचे बुडबुडे आहेत, ते कँडीला वरवर घेऊन जातात. या बुडबुड्यांबरोबर कँडीला दूर उडवण्यासाठी हवेच्या पिशव्याही आहेत. आपली कँडी कोळ्यांपासून वाचवायला हवी. कारण हे कोळी कँडी खातात आणि लेव्हल रिस्टार्ट होते. मध्येमध्ये विजेचे स्पार्क्सही असतात. त्याला स्पर्शजरी झाला तरी लेव्हल रिस्टार्ट होते.
पेपर टॉस
बॅकफ्लिप स्टुडिओजनी एक वेगळ्याच संकल्पनेचा गेम आणलाय, तोच हा पेपर टॉस. काम करून कंटाळल्यावर तुम्ही कधी कागदाचे गोळे करून कचऱ्याच्या डब्यात टाकलेत का? हेच तुम्हाला व्हर्च्युअली करायचं आहे. या गेममध्ये ६ वेगवेगळे आणि कठीण टप्पे आहेत. हाय रेझोल्युशन ग्राफिक्स आहे. ग्लोबल ऑनलाइन स्कोअरबोर्ड, अॅनिमेटेड कागद आहे. ऑफिस आहे, तिथला फॅन आहे. त्याचा स्पीड कमी-जास्त करता येतो.
असेसिन्स क्रीड ३ अमेरिकन रिव्होल्युशन
हा गेम पीसी, प्ले स्टेशन ३ आणि एक्स बॉक्स ३६०साठी आहे. असेसिन्स क्रीड, क्रीड२, असेसिन्स क्रीड ब्रदरहूड आणि असेसिन्स क्रीड रिव्होल्युशन या गेम्सच्या घवघवीत यशानंतर युबीसॉफ्ट ' असेसिन्स क्रीड ३: अमेरिकन रिव्होल्युशन ' हा गेम आणतेय. हा गेम अमेरिकन राज्यक्रांतीवर बनवलेला आहे. तो १७५३ ते १७८३ या काळावर आधारित आहे. ग्रेट ब्रिटन विरूद्धच्या युद्धातील महत्त्वाचे मोहोरे या गेममध्ये सामील करण्यात आले आहेत. आपल्याला माहित असलेल्यांपैकी जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस जेफरसन ही पात्र या गेममध्ये दिसतील. पॉल रीवियर, सॅम्युअल अॅडम्स अँड ईवन किंग जॉर्ज ३ यांच्याशी साम्य असलेली पात्रही यात आहेत.
डेड स्पेस ३
हा गेम पीसी, प्ले स्टेशन ३ आणि एक्स बॉक्स ३६० साठी आहे. विसरल गेम्स यांचा डेड स्पेस ३ हा बहुचर्चित ठरण्यास हरकत नाही. डेड स्पेस२चा हा पुढचा भाग आहे. हा गेम प्रोटॅगनिस्ट्स आइझॅक क्लार्क आणि सार्जंट जॉन कारवर आधारित असणार आहे. अटलांटिस या बर्फाळलेल्या ग्रहावर हे दोघे चुकून जातात व गेमची सुरुवात होते. ते नेक्रोमॉर्फ स्कर्जला थांबवण्याचा प्रयत्न करतात. या गेममध्ये को-ऑपरेटीव्ह गेम प्ले देण्यात आलाय. तो फेब्रुवारी २०१३ ला उपलब्ध होणार आहे.
अॅन्ड्रोंइडसाथी काही खास गेम्सची यादी
*1. Temple Run *2. Sprinkle *3. Raging Thunder *4. Angry Gran Run
*5.Ski Safari *6. Subway Surf *7. Fruit Ninja *8.Abduction
*9.Air Navy Fighters *10. Minecraft *11. Rail Rush *12.Jetpack Joyride
*13.Rope Escape *14.Beach Buggy Blitz *15.World of Goo

मोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स
Reviewed by Sooraj Bagal
on
February 11, 2013
Rating:
No comments: