मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात

माहिती आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या मराठी विश्वकोशाचे सर्व १ ते १६ खंड आता ई बुक स्वरूपात उपलब्धझाले आहेत नियोजन आयोगाचे सदस्य डॉ नरेंद्र जाधव यांच्या हस्ते नुकतेच सोळाव्या खंडाचे लोकार्पणकरण्यात आले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेले पहिले पंधरा खंड आणि प्रा मे पुं रेगेयांनी संपादित केलेला सोळावा खंड असा हा लाखो पानांचा ऐतिहासिक दस्तावेज आता इंटरनेटच्या माध्यमातूनजगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे 

चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजमध्ये आयोजित या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ जाधव यांनी आज घराघरात कम्प्युटर तसेच मोबाइलद्वारे प्रत्येकाच्या हातात इंटरनेट पोहोचले असताना युनिकोडमधून विश्वकोश जसा आहे तसा वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याची मराठी विश्वकोश मंडळाची संकल्पना अफाट असल्याचे सांगून विश्वकोश मंडळाची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे सी डॅक चे महेश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचीही स्तुती केली 
विश्वकोश मुलांनी वाचावा आणि इतरांनाही इंटरनेटवर तो वाचण्यास प्रवृत्त करावे असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला प्रयत्नवाद आशावाद उच्च ध्येय नम्रता आत्मविश्वास ,अपयशावर मात करण्याची जिद्द प्रागतिक दृष्टिकोन वेळेचे नियोजन आणि देशप्रेम ही यशाची नऊ सूत्रे असून त्यांची कास विद्यार्थ्यांनी कधी सोडू नये असेही ते म्हणाले तर विश्वकोश कोशात न राहता तो विश्वात यावा ,यासाठी ही सारी धडपड आहे असे विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष डॉ विजया वाड यांनी सांगितले ई बुक आवृत्तीनंतर विश्वकोश आता टॅबलेटवरही उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सी डॅकचेसंचालक महेश कुलकर्णी यांनी सांगितले विश्वकोशाचे सर्व खंड 
marathivishwakosh.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत 


मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात Reviewed by Sooraj Bagal on February 04, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.