‘त्या’ ई-मेलवर लक्ष ठेवा

ईमेलच्या माध्यमातून घोटाळा होण्याचे प्रमाण वाढत आहे .सायबर गुन्हेगार विविध युक्त्या त्यासाठी शोधून काढत आहेत वकील पोलिस किंवा मित्रांच्या नावानेहीसंशयास्पद आशय असणारे ई मेल आल्यास फसू नका सायबर गुन्हेगारांनी घोटाळे काढण्यासाठी नवे मार्गशोधले आहेत अशा प्रकारच्या ई मेलमध्ये क्रेडिट कार्ड बँक अकाऊंटबद्दल माहिती विचारणाऱ्या लिंक असतात नुकताच मारुती उद्योग कर्मचारी भरती करीत असून 

अंतिम मुलाखतीसाठी दिल्लीला येण्यासाठी रक्कमजमा करा अशा आशयाचा ई मेल एकाला आला तसेच तुमच्या विरूद्ध स्थानिक कोर्टात खटला दाखल झालाआहे अशा आशयाचेही ई मेल येऊ लागले आहेत असे ई मेल हे पूर्ण अभ्यास करूनच पाठविण्यात येत आहेतगेल्या काही वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्या प्रमाणात सायबरगुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे इंटरनेट वापरणारे नवखे युजर अशा ई मेलना बळी पडत आहेत इंटरनेट स्कॅमचा सर्वांत मोठा स्रोत भारत होता पण आता हा क्रम बदलला असून चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा क्रमांकलागतो आहे असे इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाचे म्हणणे आहे 

काही दिवसांपूर्वी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याने दंड जमा करण्याची मागणी करणारा एक मेल चेन्नईत एकाला मिळाला त्यात क्रेडिट कार्डने पेमेंट करण्यासाठीच्या अनेक लिंक किंवा स्टेट बँकेच्या अमूक एकाअकाऊंटमध्ये पैसे भरा असे लिहिले होते मात्र पोलिसांकडून असा कोणताही ई मेल पाठविण्यात आलानसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे वकील पोलिसांच्या नावाचा वापरही सायबर गुन्हेगार करू लागले आहेत 

इंटरनेट वापरणाऱ्यांनी कोणताही पैसे मागणाऱ्या ई मेल आल्यास त्याला प्रतिसाद देता काम नये बँका कधीहीई मेलमार्फत पैशाची मागणी करीत नाहीत त्यामुळे इंटरनेट युजर्सनी अशा ई मेलबाबत सजग राहण्याचीगरज आहे ई मेलमध्येही एखादा मेल फिशिंग स्कॅम असल्याचे नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झाली आहे . 'अनेक लोकांनी यास फिशिंग स्कॅम मेल असे शेरा दिला आहे त्यामुळे यात असुरक्षित आशय असू शकतो ,' असेनोटिफिकेशन मेलमध्ये येत आहे त्यामुळे त्याकडे युजरनी लक्ष द्यायला हवे 




email, junk, spam
‘त्या’ ई-मेलवर लक्ष ठेवा  ‘त्या’ ई-मेलवर लक्ष ठेवा Reviewed by Sooraj Bagal on March 15, 2013 Rating: 5
Powered by Blogger.