आता हवेत लिहा

आतापर्यंत कागदावर लिहिणे मोबाइलमध्ये टाइप करणेकिंवा इलेक्ट्रॉनिक पेनचा वापर करून लिहिणे कम्प्युटर टायपिंग यासारख्या गोष्टी सर्वसामान्यांना ज्ञात होत्या .पण कधी हवेत लिहिता येईल आणि ते इमेलद्वारे पाठविता येईल असा विचार कुणी गांभीर्याने केलाच नव्हता .केवळ काहीतरी हवेत बोटं फिरवून समोरच्याला तात्पुरत्या स्वरूपात संदेश पोहोचविण्यापर्यंत हे मर्यादित होतं .पण जर्मन संशोधकांनी हवेत लिहून इमेल मेसेज पाठविण्याचे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणलं आहे 

जर्मनीतील कार्ल्सरूह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील संशोधकांनी एक विशेष प्रकारचे हँडग्लोव्हज तयार केलेआहेत यामुळे टचस्क्रीनवर कीबोर्ड किंवा मोबाइलवर बोटांच्या आधारे एसएमएस टाइप करणे यासारख्यागोष्टी हद्दपार होतील असा दावा या संशोधकांनी केला आहे ख्रिस्तोफ अम्मा व सहकाऱ्यांनी तयार केलेल्याग्लोव्हजमध्ये अॅक्सिलरोमीटर आणि गायरोस्कोप बसविण्यात आले असून या आधारे हाताच्या हालचालीटिपल्या जातात ही उपकरणे नंतर हवेत काढलेली अक्षरे ओळखतात व त्यांना डिजिटल टेक्स्टमध्ये कन्व्हर्टकरतात हा डिजिटल टेक्स्ट नंतर वायरलेस माध्यमाद्वारे इमेल एसएमएस किंवा मोबाइल अॅपमध्ये पाठवलाजातो पॅटर्न रिक्गनिशन सॉफ्टवेअर ही सिस्टीम अक्षरे ओळखते यामध्ये जवळपास आठ हजार शब्द आणिवाक्य लक्षात ठेवण्याची क्षमता आहे अगदी कॅपिटल आणि स्मॉल लिखाण ओळखण्याचीही सुविधा यात आहे 

सध्या यामध्ये ११ टक्के वेळा त्रुटी आढळून आल्या मात्र लिहिणाऱ्याची पद्धत लक्षात आल्यानंतर या त्रुटी तीन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात विशेष म्हणजे हे ग्लोव्हज घालून एखादी व्यक्ती लिहीत आहे किंवा इतर काहीकाम करत आहे हे ओळखण्याची सुविधा या तंत्रज्ञानामध्ये आहे 
त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता कमी होईल .या संशोधनाला ८१ हजार डॉलर्सचा गुगल फॅकल्टी रिसर्च अवॉर्ड मिळाला असून या आधारे मोबाइल किंवा इतरमाध्यमातून हवेत टाइप करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास मदत होईल अशी आशा संशोधकांना आहे .
सध्या यावर संशोधन सुरू असून बाजारात विक्रीसाठी ते कधी खुले होईल हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही तरीभविष्यात जेव्हा केव्हा हे संशोधन सर्वसामान्यांच्या वापरात येईल तेव्हा मात्र टायपिंगचा कंटाळा असणाऱ्यांचीसोय होईल पण बोटांनी टाइप करण्यापेक्षा हवेत हात हलवून टाइप करण्याचा वेग निश्चितच कमी असणारअसल्याने टायपिंगचा वेग मात्र कमी होईल.


आता हवेत लिहा आता हवेत लिहा Reviewed by Sooraj Bagal on March 14, 2013 Rating: 5
Powered by Blogger.