मोबाइलच्या बाजारपेठेत अँड्रॉइडवर आधारित मोबाइलचा हिस्सा ७० टक्के आहे. त्यानंतर नोकिया , रिमच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. गुगल कंपनीच्या अँड्राइड मोबाइलच्या ऑपेरटिंग सिस्टिमला स्पर्धा देण्यासाठी फायरफॉक्स ही इंटरनेट ब्राउझर कंपनी पुढे सरसावली आहे. कंपनीच्या नव्या मोबाइल ऑपेरटिंग सिस्टीमवर आधारित स्मार्टपोन जुलैमध्ये बाजारात येणार आहेत. जगभरातील १३ कंपन्यांनी फायरफॉक्सच्या मोबाइल ऑपेरटिंग सिस्टिमवर विश्वास दाखविला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या हँडसेटला लागणाऱ्या हार्डवेअरच्या तुलनेत कमी क्षमतेच्या हार्डवेअरवर नवी ऑपरेटिंग सिस्टीम चालू शकणार आहे , असे मोझिलाचे म्हणणे आहे. कंपनीची ही ऑपेरटिंग सिस्टिम ओपन सोर्स आणि वेबवर आधारित , तसेच यावर थर्टपार्टी डेव्हलपरना अनेक अॅप्लिकेशन विकसित करता येऊ शकणार आहेत. यासाठी कोणतेही उत्पन्न शेअर करावे लागणार नाही. एलजी , झेटीई आणि हुवेई या कंपन्यांनी फायफॉक्सच्या ऑपरेटिंग सिस्टिमवरील हँडसेट लाँच करण्याची तयारी दर्शविली आहे. बार्सिलोनात पुढील आठवड्यात होत असलेल्या एका परिषेदत डिव्हाइस लाँच होण्याची अपेक्षा आहे. अँड्राइडपेक्षा कमी क्षमतेच्या हार्डवेअरची गरज याला लागणार असल्याने लोकांमध्ये याबाबत उत्सुकता आहे.
फायरफॉक्सचीही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम
Reviewed by Sooraj Bagal
on
March 04, 2013
Rating: