फेसबुकवर स्पॅम आणि व्हायरसच्या लिंकचा प्रसार करणे काही नवीन नाही. पण सध्या काही लिंकने फेसबुकवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे फेसबुक वापरताना काळजी घ्या नाहीतर तुमची सर्व माहिती हॅकर्सच्या डेटाबेसमध्ये जाईल.
फेसबुकवर मागील काही दिवसांपासून 'ओ आय कान्ट बिलिव्ह अॅट दिस' अशा कमेन्ट समोर एक स्पॅम लिंक फिरत आहे. या लिंकच्या प्रिव्हूमध्ये ही एक सेक्स टेप असल्याचे दाखवण्यात येत आहे. अनेक आंबटशौकीन या फोटोला भुलत असून त्या लिंकवर क्लिक करतात. आणि ती लिंक ओपन न होता बफरिंग होत राहते मात्र कोणताच व्हिडीओ ओपन होत नाही. तो व्हिडीओ स्पॅम असल्याचे लक्षात येईपर्यंत तुमच्या न कळत एखाद्या संसर्गजन्य रोगाप्रमाणे ती लिंक तुमच्या नावाने तुम्ही लाइक केलेल्या प्रत्येक फेसबुक पेजच्या सर्व पोस्टवर, मित्रांच्या स्टेटसवर तसेच असंख्य जागी कमेन्ट बॉक्समध्ये कमेन्ट म्हणून दिसत असते. मात्र त्याचे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नोटीफीकेशन येत नाही. अशा प्रकारे पसरत जाणा-या या लिंकला आणखी लोक बळी पडतात. आणि ही साखळी वाढतच जाते.
या लिंकच्या माध्यमातून भविष्यात तुमच्या कम्प्यूटरमधील डेटा करप्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा तुमचे फेसबुक अकाऊण्ट अथवा खासगी माहिती हॅकर्स चोरू शकतात. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक न करता सरळ ती डिलीट करणेच उत्तम.

सावधान... फेसबुकवर स्पॅमचा सुळसुळाट
Reviewed by Sooraj Bagal
on
March 03, 2013
Rating: