इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण!


आज झालेल्या एका कार्यक्रमात इलॉन मस्क यांच्या बोरिंग कंपनीने त्यांचा पहिला बॉगदा पूर्ण झाला असल्याचं जाहीर केलं आणि एक यशस्वी डेमोसुद्धा दाखवला. शहरातील ट्रॅफिकची समस्या दूर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं सांगितलं गेलं असून  याचा खर्च १० मिलियन डॉलर्स (१ कोटी रुपये) असणं यामधून प्रवासी कार्सची वाहतूक केली जाईल.
यासंबंधी डेमोचा व्हिडीओ : The Boring Company Tunnel

यासाठी जमिनीत एक प्रचंड मोठा बोगदा खणण्यात आला असून त्यानंतर मोठा पाईपसदृश डिझाईन तयार करण्यात आलं आहे. रस्त्यावर असलेली कार लिफ्ट/रॅम्पसारख्या उपकरणाने खाली आणत या बोगद्यात प्रवेश करेल त्यानंतर याच्या चाकांना गियर्स जोडले जातील जे या कारला पुढील प्रवास 150 MPH (२४१ किमी प्रतितास) वेगाने सुद्धा करता येतील असं मस्क यांनी सांगितलं आहे! चाचणी दरम्यान CNN साठी असलेली टेस्ला मॉडेल एक्स 35 MPH वेगानेच पुढे नेण्यात आली. त्यानंतर इच्छित स्थळी पोहोचताच पुन्हा रॅम्पचा वापर करत ती कार रस्त्यावर आणली जाईल! थोडक्यात कार्सचा जमिनीखालचा प्रवास रेल्वे प्रमाणे काम करेल.

Tesla in @boringcompany tunnel with retractable wheel gear that turns a car into a rail-guided train & back again pic.twitter.com/3a6i0NoSmi
— Elon Musk (@elonmusk) December 19, 2018

याची एक कल्पना येण्यासाठी खालील व्हिडीओ नक्की पहा

इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण! इलॉन मस्कच्या बोरिंग कंपनीचा बोगद्यामधून कार वाहतूक प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण! Reviewed by Sooraj Bagal on December 19, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.