विकसीत तंत्रज्ञान, व्हर्चुअल जगात क्रांती घडवून 'गुगल'ने तरुणाईला अक्षरश: वेड लावलंय. स्वप्नवत वाटणार्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा गुगलने प्रयत्न सुरु केले आहे. यापूर्वी गूगलने ग्लास अर्थात गॉगल लॉन्च केला होता. आता गुगलने चक्क बोलणारा, हसणारा आणि रडणारा शूज बाजारात आणला आहे. शूजमध्ये बसवण्यात आलेल्या अनेक सेंसर आणि मायक्रोचिप्स बसवण्यात आल्या आहेत. त्याच्या मदतीने परिधान करणार्या व्यक्तिच्या सवयी नोंदविल्या जाणार आहेत.
गुगलने हा शूज तयार करण्यासाठी आदीदास कंपनीची मदत घेतली आहे. या शूजचे मोचकेच मॉडेल बाजारात सादर करण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात साउथवेस्ट फेस्टिवलमध्ये गुगल शूजचा फर्स्ट लूक दाखवण्यात आला होता. बोलणारा शूज़ ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाने थेट इंटरनेटशी जोडला जातो. त्यानंतर गुगल मॅपिंगद्वारा ठिकाण आणि दिशा दर्शवतो. उल्लेखनिय म्हणजे या गुगलने अनस्यूमिंग आदीदास शूजला एका कंप्युटर आणि स्पिकरने जोडले आहे. शूजमध्ये एक्सलरोमीटर, जायरोस्कोप आणि प्रेशर सेंसर लावण्यात आले आहे. प्रवासादरम्यान तुम्ही हा शूज घालून त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. गुगल मॅपिंगच्या मदतीने तुम्ही सध्या कुठे आहात हे सुद्धा हा शूज तुम्हाला सांगेल.माध्यमातून तुम्ही व्हॉइस मेसेज देखील पास करू शकतात. धावताना एकदे ट्विट देखील करू शकतात.अॅपल कंपनीही अशा प्रकारचा शूज बाजारात उतरवणार आहे. तुमचा शूज जिर्न झाले आहेत. त्यांना टाकून देण्याची वेळ आली आहे, हे देखील तुम्हाला शूजच सांगतील, असे आधुनिक तंत्रज्ञान अॅपलच्या शूजमध्ये असणार आहे.
GOOGLE ने लॉन्च केला बोलणार, हसणारा तसेच रडणारा शूज
Reviewed by Sooraj Bagal
on
March 20, 2013
Rating:
No comments: