आयफोन आणि सॅमसंगच्या स्मार्टफोनमुळे ब्लॅकबेरी बिझनेस फोनच्या स्पर्धेतून कधी बाहेर पडला कोणालाकळलंही नाही . पण नुकत्याच लाँच झालेल्या ब्लॅकबेरीच्या ' झेड१० ' या फोनमुळे स्मार्टफोनचे मार्केट पुन्हाएकदा ढवळून निघणार आहे . या स्पर्धेत सध्या ब्लॅकबेरीसमारे सॅमसंगचा गॅलेक्सी एस ३ , नोकिया लुमिया ९२०आणि आयफोन ५ हे फोन्स आहेत . यात कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल . या सर्व फोन्समध्ये कोणवरचढ आहे हे जाणून घेऊया ...
ब्लॅकबेरी झेड १०
ब्लॅकबेरी भारतीय बाजारात आला आणि फोनच्या वापरला नवा पैलू मिळाला . कुणाचा बिझनेस तर कुणाचंऑफिस फोनवर अवतरलं . कालांतराने स्मार्टफोन बाजारात आले आणि ब्लॅकबेरी जुनाट वाटू लागला . पणनुकतंच ' ब्लॅकबेरी १० ' ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम घेऊन बाजारात आलेल्या ' झेड १० ' या फोनने अनेकटेकसॅव्ही मंडळींचे लक्ष वेधून घेतलं आहे .
आकर्षण : याचं पाहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्यात होमस्क्रीन , विजेट्स , अप लिस्ट आणि ई - मेल इनबॉक्स एकत्रकरण्यात आले आहे यामुळे युजर नॅविगेशन सोपं होणार आहे .
लॉक स्क्रीन : तुमचा फोन लॉक असला तरीही अलार्म , न वाचलेले ई - मेल्स फोनच्या डाव्या बाजूला दिसताततसंच तुमच्या मिटींग्सही सतत दिसत राहतात . फोन लॉक असतानाच कॅमेरा वापरून पटकन एखादा फोटोहीकाढू शकता . अगदी अँड्रॉइडप्रमाणे अंगठा स्लाईड करून हा फोन अनलॉक करता येतो .
होम स्क्रीन : मेन होम स्क्रीन मध्ये ' अॅक्टिव फ्रेम्स ' अर्थात अॅप्सची थोडक्यात माहिती दिसते तर त्यावर टॅपकरून ते अॅप्स सुरू करता येतात . या फ्रेममध्ये आपण सतत वापरात असलेले आठ अॅप्स आपोआप दिसतात .यामुळे सर्वात जास्त वापरात असलेले अॅप्स हाताशी राहतात .
इंटरफेस : अॅपलिस्टमध्ये अॅप्स बघण्यासाठी तुम्हाला उजवीकडून डावीकडे स्वाईप करावं लागतं . यात एकापेजमध्ये १६ अॅप्स दिसतात . जर जास्त अॅप्स असतील तर आणखी पेजेस येत जातात .
फेड इफेक्ट : एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना फेड इफेक्ट दिला आहे जो खूप मस्त आहे . यात जुन्यापानावरचे अॅप्स फेड होतात आणि नवीन पानावरचे अॅप्स दिसतात .
नोटिफिकेशन : इतर स्मार्टफोनपेक्षा या फोनमधील नोटिफिकेशनची सिस्टीम वेगळी आहे . यात तुम्हालाखालच्या बाजूने वर स्वाइप करावे लागते . याचा फायदा म्हणजे नोटिफिकेशन चेक करत असताना एखादं अॅपसुरू असेल तर ते अॅप मिनिमाईज होऊन जातं . डाव्या बाजूला नवीन इ - मेल्स , बीबीएम , एसएमएस आणिसोशल मिडिया मेसेजेस दिसत राहतात . उजव्या बाजूला स्क्रोल केलंत तर तुम्हाला या सगळ्याचा प्रिव्ह्यू दिसतो.
ब्लॅकबेरी हब ःनावाप्रमाणेच या हबमध्ये तुम्ही तुमचे अनेक ई - मेल अकाऊंट्स , बीबीएम , एसएमएस , सोशलमीडिया मेसेजेस , कॉल हिस्ट्री तसंच व्हॉटअप्स , फेसबुक , ट्विटर सारखे थर्डपार्टी अॅप्स एकत्र आणू शकता .
पर्सनल आणि वर्क मोड : ब्लॅकबेरी झेड १०मध्ये पर्सनल आणि वर्क असे दोन मोड आहेत . यातील पर्सनलमोडमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या फाइल्स , ई - मेल्स सेव्ह करून ठेऊ शकता . या मोडमधील फाइल्स एनस्क्रिप्टेडहोतात पण यात लॉकिंग सिस्टीम नसते . वर्क मोडमध्ये काम करत असताना तुमच्या कंपनीच्या नियमांनुसारत्याला बंधनं येतात . या दोन्हीचा वापर जर फोन कंपनीने दिला असेल तरच होतो .
अॅप्स वर्ल्ड : ब्लॅकबेरी १० मध्ये आपल्याला नवीन अॅप्सवर्ल्ड पाहता येणार आहे . यात अॅप्स बरोबरच म्युझिक ,व्हिडिओही खरेदी करता येऊ शकणार आहे .
कॅमेरा : ब्लॅकबेरी १० चा कॅमेरा हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य . यामध्ये टाइम शिफ्ट नावाचं एक फीचर देण्यातआले आहे . ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचा फोटो अगदी बिनचूक येऊ शकेल . याच्या कॅमेरामध्ये मोठ्या प्रमाणावरइनोवेशन्स करण्यात आले असून त्याला खूप अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत . यामुळे फोटोग्राफीचा एक छानअनुभव आपल्याला घेता येणार आहे .
ब्राऊजर : ब्लॅकबेरी१०मध्ये ब्राऊजरही बदलण्यात आला असून याचा अॅड्रेस बार विंडोजच्या फोनप्रमाणे खालच्याबाजूस असणार आहे . याशिवाय यामध्ये एचटीएमल ५ असणार आहे .
बॅटरी लाइफ : मोठी टच स्क्रीन आणि अॅक्टिव्ह फ्रेम्स असल्या तरी याची बॅटरी लाइफ इतर स्मार्टफोनपेक्षा चांगलीअसल्याचा दावा रिसर्च इन मोशन या कंपनीने केलाय . यामध्ये फिक्स टाइम बॅटरीचे अनोखे फिचर देण्यात आलेआहे .
इतर फिचर्स
प्रोसेसर - ड्युएल कोर , १ . ५ गीगाहार्टज
मेमरी - १६ जीबी इंटरनल मेमरी , ६४ जीबीपर्यंत एक्स्पाण्डेबल
कॅमेरा - आठ मेगापिक्सेल , फ्रंट कॅमेरा दोन मेगापिक्सेल
रेडीओ - नाही .
रॅम - दोन जीबी .
सिमकार्ड सपोर्ट - फक्त मायक्रो सिम
किंमत - ४३ , ४९०
सॅमसंग गॅलेक्सी एस ३
स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये ४५ टक्के शेअर्स असलेल्या कंपनीचे फोन अँड्रॉइड या अफलातून ऑपरेटिंगसिस्टीमबरोबरच कॅमेऱ्याच्या वैशिष्ट्यांमुळेही चर्चेत आहेत . त्यापैकीच गॅलेक्सी एस - ३ हा ब्लॅकबेरी झेड - १०च्या स्पर्धेत उतरणारा हा स्मार्टफोन आहे .
कॅमेरा : या फोनमधला कॅमेरा ही याची खासियत . ८ मेगापिक्सेल ताकदीचा कॅमेरा त्याच्या बॅक साइडइल्युमिनिटेड या नव्या फीचरमुळे चांगलाच लोकप्रिय आहे . या फीचरमध्ये फोटो काढताना अधिक प्रकाश पडतोआणि त्यामुळेच तो चांगला येतो . याशिवाय ' बर्स्ट ' नावाचं एक झकास फीचरही या कॅमेऱ्यामध्ये आहे . हे फीचरतुम्हाला एका विशिष्ट क्षणाचे २० फोटो काढून त्यातील आपल्या आवडीचा फोटो निवडण्याचा पर्याय देतो .त्यापैकी हवे तितके फोटो ठेऊन बाकीचे डीलिट करता येऊ शकतात . याशिवाय टच फोकस , स्माइल डिटेक्शन ,जीओ - टॅगिंग , इमेज एडिटर हे फीचर्सही सोबतीला आहेतच .
ओएस : अँन्ड्रॉइड ४ . ० ( आइस्क्रीम सँडविच )
डिसप्ले : ७२० x १२८० पिक्सेल ४ . ८ इंच सुपर एमोएलइडी डिसप्ले विथ कॅपेसेटिव्ह टच स्क्रीन , गोरिलाग्लास
इंटर्नल मेमरी : १६ / ३२ / ६४ जीबी
एक्सपांडेबल मेमरी : ६४ जीबी
रॅम : १ जीबी
कॅमेरा : ८ मेगापिक्सेल विथ ऑटोफोकस आणि एलइडी फ्लॅश , फ्रंट कॅमेरा १ . ९ मेगापिक्सेल .
फ्रंट कॅमेरा : १ . ९ मेगापिक्सेल
प्रोसेसर : १ . ५ गिगाहाटर्झ कोरटॅक्स ए ९ कोड कोर प्रोसेसर
चिप : एक्सीनोस
जी . पी . यू . : मेल ४००
रेडिओ : आहे .
वैशिष्ट्यं
स्मार्ट स्टे : जोपर्यंत तुम्ही स्क्रीनकडे बघत असाल तोपर्यंत डिसप्ले लाइट बंद होणार नाही .
डायरेक्ट कॉल : तुम्ही एखाद्याला मेसेज करत असाल आणि तुम्हाला त्याला कॉल करायचा असेल तर फक्त फोनकानाला लावला की आपोआप त्या व्यक्तीला कॉल लागेल .
इतर फीचर्स
एस बीम , एस वॉइस , अॅक्टिव्ह नॉइझ कॅन्सलेशन विथ डेडिकेटेड माइक , ड्रॉपबॉक्स , इमेज / व्हिडियो एडिटर ,डॉक्युमेंट एडिटर , टी . व्ही . आऊटपुट , एस एन एस इंटीग्रेशन , अॅडॉब फ्लॅश ११ सपोर्टेबल
काही तोटे
या फोनमध्ये फक्त मायक्रो सिम कार्ड सपोर्टेबल आहे .
विशिष्ट ' कॅमेरा की ' नाही .
किंमत - ३४ , ९००
नोकिया लुमिया ९२०
एकेकाळी मोबाइल मार्केटमध्ये राज्य गाजवणारी नोकिया . ही कंपनी स्मार्टफोनच्या मार्केटमधून बाहेर पडली .यावेळी सॅमसंग , आयफोन यांच्या तोडीस तोड बनून मार्केटमध्ये येण्यासाठी नोकियाने मायक्रोसॉफ्टच्याविंडोजशी भागीदारी करून लुमिया सीरिज लाँच केली . विंडोज ८ ही ऑपरेटिंग सिस्टिम फोनमध्ये लाँच केली .वायरलेस चार्जिंग ही या फोनची मोठी खासियत आहे . या फोनचं सर्वात मोठ वैशिष्ट्यं म्हणजे सर्वात लेटेस्टटेक्नोलॉजीची विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टीम आहे . भारतीय मोबाइल बाजारात विंडोज फोन्सशी संख्या हाताच्याबोटावर मोजण्याइतकी आहे . या फोनची बॉडी अॅल्युमिनिअम बेस्ड आहे . त्यामुळे हा दिसायला फारच क्लासीआणि आकर्षक दिसतो . याचं वजन १८५ ग्रॅम आहे . यावरून हा फोन किती हलका आहे ह्याचा अंदाज येईल . याफोनसाठी ' गोरील्ला ग्लास २ ' चा वापर करण्यात आला आहे . त्यामुळे हा फोन हातातून सटकून पडला तरीघाबरण्याची गरज नाही .
स्क्रीन साइज : ४ . ५ इंच ( १२८० x ७६८ ) प्युअर मोशन एचडी + डिस्प्ले
ऑपरेटिंग सिस्टिम : विंडोज फोन ८
प्रोसेसर : ड्यूअल कोर १ . ५ जीएचझेड स्नॅपड्रॅगन एस ४ प्रोसेसर
रॅम : १ जीबी रॅम
कॅमेरा : ८ . ७ मेगापिक्सल प्युअर व्ह्यू रेअर कॅमेरा , १ . २ मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा
मेमरी : ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज
चार्जिंग : वायरलेस चार्जिंग
कनेक्टिविटी : वायफाय , ब्लू टूथ , मायक्रो युएसबी
बॅटरी : २ , ००० एएच बॅटरी
किंमत : ३८ , १९९
आयफोन ५
मोबाइलप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते तो , ' अॅपल ' चा ' आयफोन ५ ' शुक्रवारी देशभरातीलनिवडक आउलेट्समध्ये दाखल झाला . आयफोन म्हणजे ब्रॅण्डबाबत कोणालाही शंका घेण्याचे कारणच नाही .फोनचे फीचर्स आणि त्यांचा वापर याही गोष्टी खूप चांगला अनुभव देऊन जातात . ' सॅमसंग गॅलॅक्सी एस - ३ ' 'ब्लॅकबेरी झेड १० ' आणि काही प्रमाणात नोकिया लुमिया या तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी ' आयफोन ५ ' ची कडवीटक्कर आहे .
' आयफोन५ ' ची वैशिष्ट्ये :
स्क्रीन : चार इंचाची स्क्रीन , १३६ बाय ६४० पिक्सेलचे स्क्रीन रिझोल्युशन
डिस्प्ले : रेटिना डिस्प्ले
प्रोसेसर : ड्युअल कोअर ए ६ चिप
कॅमेरा : १ . २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
मेमरी : इंटरनल १६ जीबी ते ६४ जीबीपर्यंत . ( याला एक्स्पाण्डेबल मेमरी नसते . कारण यात कार्ड स्लॉटउपलब्ध नाही .)
डिस्प्ले : एलईडी बॅकलाइट कपॅसेटिव्ह टचस्क्रीन
ऑपरेटिंग सिस्टिम : आयओएस ६ यामध्ये तुम्ही आयओएस ६ . १पर्यंत अपग्रेड करू शकता .
ब्राऊजर : एचटीएमएल सफारी ब्राऊजर
प्रोसेसर : ड्युअल कोर १ . २ गीगाहार्टज
सिमकार्ड : मायक्रो सिमकार्ड
रेडिओ : नाही .
किंमत : ३२ आणि ६४ जीबी फोनची किंमत अनुक्रमे ५२ , ५०० आणि ५९ , ५०० असणार आहे .
एक्सपिरीया झेड' मोबाईलमधील सॉफ्टवेअरपासून बॉडी पार्टपर्यंत सर्व फिचरमध्ये आधुनिक टेक्नोलॉजी
http://marathitech.blogspot.com/2013/03/xperia-sony-tablet-z-launched.html

स्मार्ट युद्ध आयफोन सॅमसंग ब्लॅकबेरी नोकिया स्मार्टफोन
Reviewed by Sooraj Bagal
on
March 17, 2013
Rating: