'विंडोज'मध्ये पुन्हा दिसेल 'स्टार्ट बटन'


webविंडोजच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सशी सगळेच परिचित आहेत .बहुतेक सगळेच जण विंडोज ची ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात . ' विंडोज व्हिस्टा ', ' विंडोज ७ ', ' विंडोज ८ 'नंतर आता विंडोज ब्लू किंवा विंडोज ८ १ येऊ घातलेआहे विंडोजच्या आधीच्या व्हर्जनमध्ये असलेल्या उणीवा दूर करून नवीन व्हर्जन अधिक आकर्षक आणि यूझर फ्रेंडली करण्याची मायक्रोसॉफ्ट ची हातोटी आहे .
 पण , ' विंडोज८ च्या बाबतीत ही हातोटी तितकीशी यशस्वी झाली नाही टच स्क्रीनची सुविधा नसलेल्या कम्प्युटरवर ही सिस्टीम तितकी समर्थपणे ऑपरेट झाली नाही आणि थेट डेस्कटॉपला बूट न होणे या बाबी अनेकांना पटल्या नाहीत त्यामुळे किमान या दोन बाबींचे समाधान विंडोज 'ने द्यावे अशी मागणी यूझरकडून बराच काळ होत होती 

ग्राहकांचा हा तक्रारींचा सूर मायक्रोसॉफ्ट पर्यंत पोहोचला असावा येऊ घातलेल्या विंडोज ब्लू मध्ये स्टार्टबटन पुन्हा दिसणार असल्याची चर्चा कम्प्युटर जगतात आहे थेट डेस्कटॉपलाही बूट करता येणार आहे या नव्या व्हर्जनमध्ये हे बदल होण्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे खात्रीशीर वृत्त मात्र नाही त्यामुळे हे नक्की काय गौडबंगाल आहे हे जाणून घेण्याचे कुतूहल ग्राहकांमध्ये आहे मात्र असा बदल झाला तर तो ग्राहकांसाठी इष्टच आहे असे झाले तर कंपनीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे होईल की मायक्रोसॉफ्ट बॅक फूटवर गेली आहे आणि पुन्हा एकदा यूझरच्या मागणीला अनुसरून आपल्या सिस्टीममध्ये ती पूर्वीप्रमाणे बदल करेल

नव्या व्हर्जनमध्ये पहिल्यांदा हे बदल प्रस्तावित नव्हते पण ते होण्याची दाट शक्यता आहे वेगवेगळ्या माध्यमांतून गेल्या आठवड्यांपासून ही वृत्ते येत आहेत . ' मेट्रो स्टाइल मध्ये होणाऱ्या बूटिंगला फाटा देऊन थेट डेस्कटॉप बूटिंग यूझरना करता येईल अशी सुविधा पुरवण्याकडे मायक्रोसॉफ्टची वाटचाल सुरू आहे . ' विंडोज 'वर स्टार्ट बटन ही पुन्हा येण्याची शक्यता असल्याचे विविध सूत्रांनी सांगितले आहे 

विंडोज ब्लू चे उत्पादन या वर्षी कदाचित सुरुवात होईल त्यावेळी हे दोन्ही बदल होतील की नाही हे सर्वांना कळेलच तत्पूर्वी काही अधिकृत घोषणा झाली तर ग्राहकांसाठी उत्तमच ! ' विंडोज ८ चा यूझर इंटरफेस हा चांगला आहे मात्र टच स्क्रीन नाही त्यांच्यासाठी विंडोज चे जुनेच व्हर्जन चांगले असे सध्या म्हणावे लागत आहे बरेचसे यूझर त्यामुळे जुन्याच व्हर्जन्सना पसंती देत आहेत . ' विंडोज ब्लू मधील नव्या बदलाने हा त्रास टळून विंडोज अधिक यूझर फ्रेंडली सिस्टीमचा वापर सर्वांना करता येईल याची आशा बाळगूया 

'विंडोज'मध्ये पुन्हा दिसेल 'स्टार्ट बटन' 'विंडोज'मध्ये पुन्हा दिसेल 'स्टार्ट बटन' Reviewed by Sooraj Bagal on April 20, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.