ई-मेलचे मॅनेजमेंट

दोन तास १४ मिनिटे ... आपण दिवसातील एवढा वेळ ई -मेल तपासण्यासाठी घालवत असतो याचाच अर्थ असा की आपण आपले ई मेल्स तपासणे आणि त्याला उत्तरे देण्यासाठी आपल्या कामाच्या वेळेतील २५ टक्के वेळ खर्च करत असतो मॅकेन्सीने नुकतेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार सन २०१२मध्ये ई मेल हे दैनंदिन कामातील सर्वात मोठे काम असल्याचे समोर आले आहे 


इनबॉक्समध्ये येणाऱ्या ई कॉमर्स किंवा डिस्काउंटच्या जाहिराती त्रासदायक ठरतात बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एका माणसाला दिवसाला किमान १०० ई मेल्स वाचायचे असतात ही माहिती टेक्नॉलॉजी मार्केटिंग फर्म रडेकटी ग्रुपने केलेल्या पाहणीत समोर आली आहे यातील बहुतांश मेल्स डीलीट करण्यात वेळ वाया जातो कामाच्या गडबडीत वेळ वाचवायचा असेल तर काही सुविधांचा वापर करता येऊ शकेल 

अनरोल डॉट मी (Unroll.me) - यामध्ये सर्व ई मेल्सच्या इनबॉक्समधील जाहिरातींचे मेल्स आपण एकाच वेळी जमा करू शकतो याला डेली डायजेस्ट म्हणतात तुमच्या मेल्समधील मसेजेस इथं आले की तुम्ही ते सर्व ई -मेल्स डिलिट करू शकतात ही सेवा जीमेल आणि याहू मेल यांच्यासाठी उपलब्ध आहे 

फॅन मिक्स (FanMix) - जे सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करतात अशा युजर्ससाठी ही सेवा उपयुक्त ठरूशकते यामध्ये आपल्या ई मेलवर येणारे सर्व नोटिफिकेशन्स एकत्र केली जातात याचा फायदा असा की ,आपल्याला ट्विटर फेसबुक लिंक्डइन आणि ब्लॉग कन्व्हरसेशन एका ठिकाणी दिसू शकतात यात आपल्याला फेसबुक नोटिफिकेशनबरोबरच फेसबुक मेसेजेसही पहावयास मिळतात 

सेनबॉक्स (SaneBox) - या सेवेमध्ये महत्त्वाचे नसलेले ई मेल्स एकत्रित केले जातात जेणेकरून इनबॉक्समध्ये आपल्याला केवळ महत्त्वाचे मेल्स उपलब्ध राहतील ही सुविधा आपण जीमेल याहू एओएल अॅपल मेल ,आऊटलूक आयफोन अँड्रॉइड या सर्वांसाठी उपलब्ध आहे 

द ई मेल गेम (The Email Game) - आपला इनबॉक्समध्ये एकही बिनकामाचा मेल न ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे द ई मेल गेम यामध्ये आपल्या इनबॉक्समधील मेल्सचे व्यवस्थित बायफरकेशन केले जाते .यामुळे आपला इनबॉक्स अधिक स्वच्छ दिसू शकतो 

झीरो बॉक्सर (0Boxer) - ही एक जीमेलची प्लगइन टूल आहे या माध्यमातून आपण आपले मेल्स अर्काइव्हमध्ये ठेऊ शकतो तसेच आपल्या ई मेल्सला रिप्लायही देऊ शकतो ही सुविधा सध्या बीटा मोडमध्ये उपलब्ध आहे .पण या सुविधेमध्येही आपण आपला इनबॉक्समध्ये एकही मेल राहणार नाही याची काळजी घेऊ शकतो .

ई-मेलचे मॅनेजमेंट  ई-मेलचे मॅनेजमेंट Reviewed by Sooraj Bagal on April 19, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.