दक्षिण कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी मेगा सीरीजचा स्मार्टफोन सादर केला आहे. यावेळी कंपनीने एंड्रॉईड आधारित दोन नवे स्मार्टफोन गॅलेक्सी मेगा 6.3 आणि गॅलेक्सी मेगा 5.8 सादर केले आहेत. गॅलेक्सी मेगा 6.3 हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा स्मार्टफोन असेल. ही दोन्हीही मॉडेल एंड्राईड 4.2 जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत अजून जाहीर केली आहे.
गॅलेक्सी मेगामध्ये जबरदस्त अशी फिचर्स आहेत. यात 'ग्रुप प्ले' नावाचे एक फिचर्स आहे. त्याद्वारे एक वाय-फाय नेटवर्कवर कोणताही कंटेंट एकाच वेळी आठ मोबाईल फोनद्वारे शेयर केले जावू शकते.
सॅमसंग वॉच ऑन: या स्मार्टफोनद्वारे टिव्ही पाहण्याचा अंदाज बदलून जाणार आहे. हा स्मार्टफोन इंफ्रारेड रिमोट कंट्रोलरची भूमिका निभावतो. याला आपल्या घरातील एंटरटेनमेंट सिस्टीमला जोडू शकता. यात टिव्ही प्रोग्रॅम, शेड्यूलची माहिती मिळेल. तर, दुसरीकडे तो आपल्या टिव्हीच्या रिमोट कंट्रोलरची भूमिका निभावेल.
स्क्रीन : 6.3 इंच, टीएफटी एचडी
प्रोसेसर : 1.7 गीगाहर्टज ड्युअल कोर, 1.5 जीबी रॅम
मेमरी : 8 आणि 16 जीबी, 64 जीबीची एक्सटर्नल मेमरी
कनेक्टिविटी : 2जी, 3जी, 4जी, वायफाय, ब्लूटूथ 4.0, माइक्रो यूएसबी 2.0 आणि एनएफसी.
कॅमेरा : रियर-8.0 मेगापिक्सल, एलईडी फ्लॅश आणि फ्रंट- 1.9 मेगापिक्सल

... हा असा स्मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल!
Reviewed by Sooraj Bagal
on
April 15, 2013
Rating:
No comments: