एमएसऑफिस आयफोनवर

ifone.jpgतंत्रज्ञानाचे जाळे जसजसे वाढत जाईल तसे कम्प्युटर लॅपटॉप टॅब्लेट स्मार्टफोन हे सगळे एकाच माळेतले वेगवेगळ्या आकारातील मणी वाटतीलअसे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही टीव्ही ,कम्प्युटर इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमधील पायऱ्याच आहेत स्मार्टफोनवर इंटरनेट पाहता येईलसर्च करता येईल असे कुणालाही वाटले नव्हते पण तसे झाले आता आणखी एक वरची पायरी या क्षेत्रात येऊ घातलीय ती म्हणजे अॅपल च्या आयफोनवर मायक्रोसॉफ्ट ऑफिसची सॉफ्टवेअर वापरता येणार आहेत वर्ड एक्सेल पॉवरपॉइंट आयफोनवरही वापरता येणार आहे वेगवेगळी सॉफ्टवेअर स्मार्टफोनवर वापरता येतील याकडेच तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू आहे 


आयफोनवरील सॉफ्टवेअरच्या वापरासाठी कंपनी कुठलेही नवे व्हर्जन तयार करणार नाही तसेच अॅन्ड्रॉइड व्हर्जनसाठी वेगळी अॅप बनवणार नाही . ' मायक्रोसॉफ्ट ची विंडोज सिस्टीम असणाऱ्या टॅब्लेट कम्प्युटरवर ही सॉफ्टवेअर्स वापरता येणार आहेत मोबाइलसाठी बनवण्यात आलेला ऑफिसमोबाइल चा सूट अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये फ्री उपलब्ध आहे मात्र त्यासाठी दर वर्षाला 'ऑफिस ३६५ विकत घ्यावे लागणार आहे . ' ऑफिस ३६५ असेल तर मॅक असलेल्या कम्प्युटरवर आणि विंडोज कम्प्युटरवर ते वापरता येईल . ' ऑफिस चे पॅकेज असेल तर वेगवेगळ्या कम्प्युटरवर ते चालवता येईल तसेच त्याचे अपडेटही मिळतील 

कम्प्युटरवरच्या फाइल आयफोनवर ओपन करता येतील केवळ हेवी वर्क त्यामध्ये करता येणार नाही मोठे ग्राफिक एखादा मोठा प्रबंध आणि त्याचे पूर्ण डिझाइन करायचे असेल तर कम्प्युटरशिवाय पर्याय नाही मात्र छोट्या कामांसाठी आयफोन वापरता येईल मेल करणे ,फाइलमध्ये छोटासा बदल करणे काही शब्द वाढवणे काढणे प्रेझेंटेशन सादर करण्यासारख्या गोष्टी आयफोनवरील ऑफिस सॉफ्टवेअर मध्ये करता येतील कम्प्युटरवरील फाइल आयफोनवर ऑटोमेटिक रिसाइज होतील आयफोन अॅपमुळे कम्प्युटरवर तयार करण्यात आलेले चार्ट ,अॅनिमेशन आणि इतर माहितीमध्ये काहीही बदल होणार नाही अमेरिका सोडून इतर देशांत लवकरच हे प्रॉडक्ट उपलब्ध होणार आहे 

एकंदरीतच कम्प्युटरचा आकार स्मार्टफोनपर्यंत लहान होत चाललाय असे म्हटले तर ते चुकीचेठरणार नाही कम्प्युटरवरील सगळी अॅप्लिकेशन आता हळूहळू स्मार्टफोनवरही करता येत आहेत .इंटरनेट ऑफिस सॉफ्टवेअर गाणी ऐकणे व्हिडिओ यांसारख्या फॅसिलिटी स्मार्टफोनवरही आहेत .फरक आहे तो केवळ काम करण्याच्या क्षमतेचा हा फरकही आगामी काळात पुसट होत जाऊन 'युनिव्हर्सल पॅकेज असलेले एकच डिव्हाइस बाजारात येईल अशी कल्पना करायला तूर्तास तरी हरकत नाही 


एमएसऑफिस आयफोनवर एमएसऑफिस आयफोनवर Reviewed by Sooraj Bagal on July 07, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.