संगीतातील दिग्गज अँड्रॉइडवर

पंकुमार गंधर्व यांच्यापासून ते गझलगायक जगजितसिंग यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या संगीताचा आनंदत्यांच्याविषयी माहिती आता एका टॅबच्या टप्प्यात आली आहेनाशिकच्या वैभव महाजन या संगीतप्रेमी इंजिनीअर तरुणाने भारतीय संगीतातील काही दिग्गज कलावंत अँड्रॉइडअॅप्लिकेशनच्या माध्यमातून स्मार्टफोनवर आणले असूनही अॅप्लिकेशन विनामूल्य डाउनलोड करता येतात.


व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या महाजनची 'आबराका डाबरा सॉप्टवेअर सोल्युशन्सही कंपनी आहेतो स्वतः संगीताचे चाहता असूनगेली काही वर्षे तबल्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत आहेनोकरीच्या निमित्ताने काही वर्षं पुण्यात आणि युरोपमध्ये वास्तव्य केल्यानंतर आता तो नाशिकमध्ये राहातो.गेल्या वर्षभरात त्याने पंकुमार गंधर्वपंभीमसेन जोशीकौशिकी चक्रवर्तीपंजितेंद्र अभिषेकी,तबलावादक आदित्य कल्याणपूरध्रुपद गायक पंउल्हास कशाळकरगझलगायक जगजितसिंग या दिग्गज कलाकारांची अँड्रॉइड अॅप्लिकेशन्स तयार केली आहेत.

या अॅप्लिकेशनविषयी माहिती देताना महाजन म्हणाले, 'सध्या इंटरनेटमुळे कोणाचीही माहिती मिळू शकतेमात्रती एकगट्ठा पद्धतीने उपलब्ध होत नाहीया अॅप्लिकेशनमुळे संगीतप्रेमींना या कलाकारांविषयीची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेलबदलत्या काळात अँड्रॉइड मार्केट ही मोठी क्रांती ठरली आहेसंगीत क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेल्या देशविदेशातील महत्त्वाच्या कलाकारांसाठी हे माध्यम व्यासपीठ ठरावे असा प्रयत्न आहेसध्या वाढत असलेल्या स्मार्टफोनच्या वापरामुळे अशा अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक कलाकार लोकांसमोर येऊ शकतील.'

या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून त्याने या कलाकारांविषयी इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती,व्हीडिओगाणीफोटो एकत्र केले आहेमहत्त्वाचे म्हणजेही अॅप्लिकेशन विनामूल्य आहेत.

'आता त्यांना ज्ञानपीठ विजेते साहित्यिक विवाशिरवाडकर तथा कुसुमाग्रजगायक वसंतराव देशपांडेशौनक अभिषेकीसंगीतकार शांतनू मोईत्राज्येष्ठ तबलावादक योगेश सम्सी या कलाकारांचीही अॅप्लिकेशन करण्याची इच्छा आहे.'

या अॅप्लिकेशन्सना अँड्रॉइड मार्केटवर चांगला प्रतिसादही मिळू लागला असूनहजारांच्या घरात डाउनलोड झाले आहेततसेच वापरणाऱ्यांनी त्याबाबत चांगल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेतयेत्या काही कालावधीत वैभव हीच अॅप्लिकेशन अँड्रॉइडसह ब्लॅकबेरी आणि आयफोनवरही उपलब्ध करून देणार आहे.


संगीतातील दिग्गज अँड्रॉइडवर संगीतातील दिग्गज अँड्रॉइडवर Reviewed by Sooraj Bagal on July 05, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.