कॅनन पॉवरशॉट एन


डिजिकॅम किंवा कॉम्पॅक्ट डिजिटल कॅमेरा असे म्हटले की, एक विशिष्ट प्रकारचा आकार असलेला कॅमेरा आपल्या नजरेसमोर येतो. पण आताचा जमाना हा ट्रेंडी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या डिझाइनच्या बाबतीत काही नवीन प्रयोग सातत्याने करतात आणि त्यातून स्वत:च्या नावावर एक नवा ट्रेंड आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. असाच एक आकार आणि प्रकाराच्या बाबतीतील एक वेगळा प्रयत्न आता कॅनन या प्रसिद्ध कंपनीने केला आहे.

त्यांनी बाजारपेठेत आणलेले पॉवरशॉट एन हे मॉडेल आकारानेच त्याकडे आपले लक्ष वेधून घेते. त्याचा आकार नेहमीच्या डिजीकॅमप्रमाणे आयताकृती नाही तर तो चौकोनी आहे. शिवाय मागच्या बाजूस असलेला एलसीडी डिस्प्ले स्क्रीन हा वरती-खालती करता येतो आणि वळवताही येतो. त्यामुळे त्याची हालचाल करून वेगवेगळ्या कोनांतून फोटो टिपणे सोपे जाते. अलीकडे अशा प्रकारच्या कॅमेऱ्यांना तरुणाई अधिक पसंती देताना दिसते.
त्याचा चौकोनी आकार हा हाताळणीसाठी बराचसा सोयिस्कर आहे. केवळ आकार एवढेच काही याचे वैशिष्टय़ नाही, तर यामध्ये अनेक वैशिष्टय़े ठासून भरलेली आहेत. या कॅमेऱ्यासाठी कॅननने १२.१ मेगापिक्सेल सीमॉस सेन्सर वापरला आहे. शटर आणि झूम या दोन्हींसाठी त्याला स्वतंत्र सोयी देण्यात आल्या आहेत. तर एलसीडी स्क्रीन हा २.८ इंचाचा देण्यात आला आहे. शिवाय हा टचस्क्रीन असल्याने त्याच्या माध्यमातूनही कॅमेरा वापरता येतो. 

या कॅमेऱ्याला ८ एक्स ऑप्टिकल झूमची सोय देण्यात आली असून, त्याला २८ मिमीची वाइड अँगल लेन्सही आहे. यावर १०८० पी क्षमतेचा फूल एचडी व्हिडीओही रेकॉर्ड करता येतो.
कॅमेऱ्यामध्येच वाय- फायची सोयही देण्यात आली आहे. त्यामुळे त्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनवर यातील फोटो टिपल्याटिपल्या शेअरही करता येतील.
भारतीय बाजारपेठेतील किंमत  - रु. २०,९९५/-


मेगापिक्सेल    १२.१
सेन्सर    १/ २.३इंच सी मॉस
लेन्स    ५.०- ४०.० मिमी. (३५ मिमी. फिल्म कॅमेऱ्याशी तुलना करता २८-२२४ मिमी.)
आयएसओ    आयएसओ ८० ते आयएसओ ६४००
झूम रेषो    ८ एक्स ऑप्टिकल झूम
अपर्चर    एफ/३.०- एफ / ०.० (डब्लू), एफ ५.९- एफ / १८ (टी)
शटर स्पीड    १-१/ २००० सेकंद
डिस्प्ले    २.८ इंच, ४६१००० डॉट एलसीडी
बॅटरी    एनबी-९एल
कॅमेऱ्याचा आकार    ७८.६ ७ ६०.२ ७ २९.३ मिमी.
वजन    १९५ ग्रॅम्स.


Loksatta
कॅनन पॉवरशॉट एन कॅनन पॉवरशॉट एन Reviewed by Sooraj Bagal on July 22, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.