या फोनला एक झूम रिंग आहे. ती फिरवताच 'इन कॉल फोटो शेअर' फिचर सुरु होते. या फिचरमुळे कॉल करतानाही फोटो काढून एमएमएसद्वारे पाठविणे शक्य आहे. एस4 झूममध्ये 1.9 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.फोन तांत्रिकदृष्ट्या अतिशय पॉवरफुल आहे. फोनला 1.5 GHz ड्युअल कोर प्रोसेसर असून ऍंड्रॉईड 4.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्टिमवर तो चालतो.
फोनला 1.5 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. युझर्ससाठी 5 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी उपलब्ध राहील. तसेच 64 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येईल. या फोनला 2330 mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी आहे. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे किंमत 29,900 रुपये आहे.'गॅलेक्सी एस4 मिनी' आणि 'एस4 झूम'मध्ये दोन मोठे फरक आहेत. 'मिनी'मध्ये 1.7 GHz ड्युअल कोर प्रोसेसर आहे. तसेच हा फोन ऍंड्रॉईड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्टिमवर चालतो. याशिवाय 1.5 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल मेमरी फोनमध्ये आहे.
सॅमसंगने आणले जबरदस्त 'गॅलेक्सी एस4 झूम' आणि 'एस4 मिनी'
Reviewed by Sooraj Bagal
on
July 14, 2013
Rating:

No comments: