गुगल कंपनीने डिजिटल डेटा उपलब्ध करून देण्यात , तर क्रांतीच निर्माण केली आहे. अर्थात , सर्व संदर्भ गुगल या कंपनीने गोळा केले नसले , तरी ते एका क्लिकवर इंटरनेटवर माहिती शोधणाऱ्या यूजरला कसे उपलब्ध होऊ शकतील , याची काळजी मात्र नक्कीच घेतली आहे. ही माहिती फक्त काही देश , विषय यांच्या पुरती मर्यादित ठेवलेली नाही. सर्व माहितीची लिंक सर्चच्या आधारे मिळविता येते. संबंधित यूजरने अपेक्षित सर्चचा शब्द योग्य टाइप केलेला नसला , तरी त्याचा संदर्भ घेऊन सर्च रिझल्ट गुगल कंपनीचे सर्च इंजिन दाखविते. आता तर , टाइप करतानाचा संबंधित शब्दाशी निगडित सजेशनही त्यावर येतात. त्यामुळे त्यातून योग्य पर्याय निवडता येतो. या सर्व गोष्टी एका क्लिकच्या आधारे उपलब्ध झाल्याने नव्या पिढीला संदर्भ शोधण्यासाठी किती कष्ट , वेळ द्यावा लागतो , याची कल्पना करता येणार नाही. मात्र , या स्रोतावर अवलंबून राहण्यानेच ऐनवेळेला फजिती होऊ शकते. शनिवारी सकाळी पाच मिनिटे गुगल कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा म्हणजे जीमेल , ड्राइव्ह , मॅप आणि चॅट बंद झाल्या होत्या.
या पाच मिनिटांत इंटरनेटवरील वापरावर ४० टक्के परिणाम झाला. यावरील अॅक्टिव्हिटी ४० टक्क्यांनी कमी झाली. गुगल कंपनीच्या सेवांवर जागतिक पातळीवरील इंटरनेट यूजर किती अवलंबून आहेत , हे कळू शकते. याहू आणि मायक्रोसॉफ्ट बिंग या कंपन्याही विविध सेवा देतात. मात्र , गुगल सेवा काही मिनिटे बंद राहिल्यावर झालेला परिणाम मोठा असल्याचा हवाला एका कंपनीने दिला आहे. यावरून गुगल ही इंटरनेटवरील दादा कंपनी असल्याचे स्पष्ट होत आहे ; तसेच लोकांचा यावरील अवलंबित्व किती मोठे आहे , हेही स्पष्ट होत आहे.
‘गुगल’वरच नेटची दुनिया बुलंद
Reviewed by Sooraj Bagal
on
August 28, 2013
Rating:

No comments: