मोटो एक्स स्मार्टफोनमध्ये आधुनिक स्पेसिफिकेशन्स आहेत. एकतर दोन तगड्या ब्रॅण्डचे नाव या हॅण्डसेटसोबत जुळले आहे. दुसरे म्हणजे हॅण्डसेटमध्ये असलेले फिचर्स अतिशय स्मार्ट आहेत. गुगलने मोटोरोलाला 12.5 बिलियन डॉलर्समध्ये टेकओव्हर केले होते. हा फोन नव्या भागीदारीसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. मोटो एक्समध्ये 4.7 इंचाचा स्क्रीन फुल एचडी डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 1280*720 मेगापिक्सेलचे रिझॉल्यूशन देतो. फोन सध्या केवळ एकाच रंगात आहे, (काळा)
मोटो एक्समध्ये ऍण्ड्रॉईड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्टिम आहे. तसेच 10 मेगापिक्सेल मुख्य आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन सप्टेंबरच्या अखेरीस विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होईल.
गुगलने लॉंच केला जबरदस्त फिचर्सने सज्ज 'मोटो एक्स' स्मार्टफोन
Reviewed by Sooraj Bagal
on
August 14, 2013
Rating:

No comments: