विंडोज 8 ओएस असलेले टॅब्लेट, मोबाईल आणि संगणकांसाठी नवे अॅप. मायक्रोसॉफ्टने आयआरसीटीसीसाठी हे अॅप तयार केले आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर करुन रेल्वे आरक्षण करणे अतिशय सोईस्कर होणार आहे.
या अॅपमध्ये अनेक नव्या सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हे अॅप मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावे लागेल.अॅप निःशुल्क आहे. आयआरसीटीसीची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली होती. भारतीय रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट आरक्षण याच वेबसाईटवरुन होते. इतर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यादेखील याच साईटच्या मार्फत तिकीट बुक करतात.
इंटरनेटवरुन रेल्वे रिझर्व्हेशन करणा-यांसाठी मायक्रोसॉफ्टने आणले एक खास अॅप...
Reviewed by Sooraj Bagal
on
September 22, 2013
Rating:

No comments: