CANDY CRUSH SAGA: सर्वांचाच आवडता गेम

CANDY CRUSH SAGA: सर्वांचाच आवडता गेम2013 मध्ये अनेक फोन लॉन्च झाले आणि त्यासोबतच कित्येक अ‍ॅप्सही आले. काही अ‍ॅप्स लोकांच्या विशेष पसंतीस उतरतात. 2013 मध्ये सर्वात जास्त डाउनलोड केल्या गेलेल्या अ‍ॅप्समध्ये कॅंडी क्रश सागा या सर्वांच्या आवडत्या गेमचा समावेश आहे. गिजमोडोने सादर केलेल्या यादीत या अ‍ॅपचा समावेश आहे. 
 
अँड्रॉइड 2.2 किंवा त्याच्या पुढच्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणा-या हे अ‍ॅप आता पर्यंत एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे. गुगल प्ले वर हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे. 
 
या गेममध्ये 400 पेक्षा जास्त लेवल आहेत. कॅंडी क्रश सागामध्ये कॅंडी ग्राफिक्सही देण्यात आले आहेत. हा गॅम खूपच रंजक आहे. 
 
गुगल प्ले च्या युजर रेटींगमध्ये या गॅमला 5 पैकी 4.4 गुण मिळाले आहेत. या अ‍ॅपची साइज प्रत्येक डिवाइससाठी वेगळी आहे. BBCच्या मतानुसार हा गॅम महिलांमध्येही लोकप्रिय आहे. याचे कारण काय असेल हे शोधेणे मात्र अवघड आहे. या गेममध्ये ग्राफिक्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी या गेममध्ये काहीतरी वेगळे देण्यात आल्याने हा गेम सर्वाचा आवडता आहे.   
CANDY CRUSH SAGA: सर्वांचाच आवडता गेम CANDY CRUSH SAGA: सर्वांचाच आवडता गेम Reviewed by Sooraj Bagal on January 18, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.