जगभरातील प्रत्येकाला 'वायफाय' सेवेचा मोफत लाभ घेता यावा, यासाठी एक अमेरिकन कंपनी घनाकृती कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट डेटा प्रक्षेपित करण्याचे नियोजन करीत आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास खंडांच्या, देशांच्या सीमा आड न येता प्रत्येकाला मोफत इंटरनेट वापराची संधी प्राप्त होणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत जगभरातील नागरिकांना त्यांचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन कोणत्याही सेन्सॉरशिपविना मोफत आणि अमर्याद इंटरनेट अॅक्सेस मिळविता येणार आहे, असा दावा न्यूयॉर्कमधील 'मीडिया डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट फंड' (एमडीआयएफ) या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. त्यासाठी ही संस्था घनाकृती कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून 'आउटरनेट' नामक विस्तृत जाळे विणणार आहे. त्याअंतर्गत इंटरनेट डेटा जगभर प्रक्षेपित करण्यात येईल. जेणेकरून कुणालाही स्मार्टफोन, टॅब्लेट अथवा कम्प्युटरच्या माध्यमातूनही मोफत इंटरनेट सेवा वापरण्याची संधी उपलब्ध होईल. 'आउटरनेट'च्या माध्यमातून प्रक्षेपित होणारे डेटा सिग्नल 'कॅच' करण्यासाठी जगभरात शंभर ठिकाणी ग्राउंड स्टेशनची उभारणी करण्यात येईल. 'एमडीआयएफ'च्या अहवालानुसार आजही जगभरातील चाळीस टक्के नागरिकांना इंटरनेटच्या सुविधेपासून वंचित आहेत. 'आउटरनेट'च्या माध्यमातून सायबेरियापासून अमेरिकेच्या पश्चिमेकडील भाग, तसेच निर्मनुष्य बेटांपासून आफ्रिका खंडातील अतिदुर्गम भागांपर्यंत इंटरनेटचे विस्तृत जाळे विणणे सहज शक्य होणार आहे.
'आउटरनेट'ची कार्यपद्धती काय?
'आउटरनेट'च्या माध्यमातून एकाच दिशेने (वन वे) फीडर्सद्वारा कृत्रिम उपग्रहांकडे इंटरनेट डेटा सोडण्यात येईल. हे उपग्रह मिळालेला डेटा स्वीकारून जगभर उभारण्यात आलेल्या ग्राउंड स्टेशनकडे प्रक्षेपित करतील. जेथे पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होईल, तेथे अशा प्रकारची स्टेशन उभारण्यात येणार आहेत.
प्रचंड खर्च अपेक्षित
जगभर मोफत 'वायफाय सेवा' देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या नेटवर्कसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. अवकाशात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांच्या चलनवलनासाठी एक लाख ते तीन लाख डॉलरचा खर्च अपेक्षित आहे.

...तर जगभरात वापरता येणार मोफत, अमर्याद इंटरनेट
Reviewed by Sooraj Bagal
on
March 07, 2014
Rating:
No comments: