स्पर्धेच्या अटी आणि शर्तींचा भंग केल्याप्रकरणी सर्च इंजिन क्षेत्रातील आघाडीच्या 'गुगल'ला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 'गुगल'चे व्यवहार 'कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया' (सीसीआय) अर्थात स्पर्धा आयोगाच्या रडारवर आले असून, त्यात तथ्य आढळल्यास कंपनीला ५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर 'गुगल'शी संपर्क साधला असता, चौकशीदरम्यान 'सीसीआय'शी पूर्ण सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचे स्प्ष्ट करण्यात आले. अमेरिकेतील स्पर्धा आयोगाने 'गुगल'च्या मागील दोन वर्षांतील कारभाराचा आढावा घेतला असता, त्यात कंपनीची सेवा आणि उत्पादने स्पर्धेच्या नियमाला धरून असल्याचे म्हटले आहे. मात्र, 'गुगल' विषयीच्या तक्रारी भारतातून आल्या असल्याने अमेरिकन आयोगाचा निर्णय ग्राह्य धरण्यात येणार नाही. 'गुगल'विषयी स्पर्धा आयोगाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्याचे म्हटले आहे. त्यातही गेल्या दोन वर्षांमध्ये तक्रारींचे प्रमाण वाढल्याचाही आयोगाचा दावा आहे.
या तक्रारींमध्ये भारतात वर्चस्व मिळविण्यासाठी 'गुगल'कडून नियमबाह्य प्रकारांचा अवलंब केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एखादी कंपनी स्पर्धेच्या अटी आणि शर्तींचा भंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास गेल्या तीन वर्षांच्या एकूण सरासरी उलाढालीच्या १० टक्के रकमेचा दंड करण्यात येतो. गेल्या तीन वर्षांत 'गुगल'ची सरासरी एकूण उलाढाल ४९.३ अब्ज डॉलरच्या घरात आहे. त्यामुळे स्पर्धा आयोगाच्या नियमानुसार
'गुगल'ला दहा टक्क्यांप्रमाणे अंदाजे ५ अब्ज डॉलरचा दंड बसण्याची शक्यता आहे. 'स्पर्धा आयोगाच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, आमचे व्यवहार आणि इतर सर्व बाबींना अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनने क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे,' अशी माहिती 'गुगल'च्या प्रवक्त्याने दिली.

‘गुगल’ला पाच अब्ज डॉलरचा दंड?
Reviewed by Sooraj Bagal
on
March 14, 2014
Rating:
No comments: