मोबाईल जगतातील दिग्गज कंपनी अॅपलने आपल्या आयफोन,आयपॅड आणि आयपॉडसाठी नवी ऑपरेटिंग सिस्टिम आणली आहे. अॅपलने आयफोन ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 सुरु केली आहे.
यामध्ये ‘कार प्ले’ हे मुख्य फीचर आहे. अॅपलची ही ऑपरेटिंग सिस्टिम कारसाठी डिझाईन केली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कारमध्ये हे फीचर नाही. मात्र होंडा, ह्युंडाई, जग्वार, मर्सिडीज आणि वॉल्वो या कारधारकांना, आपल्या कारमध्ये या वर्षात आयफोन अॅप्लिकेशन कनेक्ट करता येणार आहे.
याशिवाय 7.1 ऑपरेटिंग सिस्टिममध्ये दुसऱ्या बदलांसह, फास्ट अॅनिमेशनचाही आनंद लुटता येणार आहे.
7.1 ऑपरेटिंग सिस्टिममध्ये नवं काय?
कॅमे ऱ्याचा ऑटो फ्लॅश ऑन झाल्यानंतर, ही ऑपरेटिंग सिस्टिम एक इंडिकेटर आणि आयफोन 5S मध्ये HDR मोड ला नव्या ऑपश्नसोबत जोडेल. यूझर दुसऱ्या डिव्हाईसव वापरेल, तेव्हा फेसटाईम कॉलचे सर्व नोटिफिकेशन्स आपोआप बंद होतील. ‘पुश-टू-टॉक’ला सुद्धा ही सिस्टिम सपोर्ट करेल. याशिवाय ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 मध्ये नवा बॉर्डर बटणसह अन्य काही फीचर्सना जोडेल.
ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 सॉफ्टवेअर अपडेट सेक्शनमध्ये सेटिंगनंतर यूझर्ससाठी उपलब्ध असेल.
आयफोनची ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 लॉन्च
Reviewed by Sooraj Bagal
on
March 12, 2014
Rating:
No comments: