एडवर्ड स्नोडेनने उघड केलेल्या अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या (एनएसए) प्रतापांनंतर जगभरात इंटरनेटच्या खासगीकरणासंदर्भातील जागरुकता वाढली आहे. रशियाने तर थेट टाइपरायटरचा वापर सुरू केला. इतरांना मात्र हे शक्य नव्हते. त्यांच्यासाठी एन्क्रिप्टेड मेलची सुविधा जीमेलने उपलब्ध केली आहे. यामुळे मेलमधील माहितीचा गैरवापर करणे अतिशय कठीण होणार असल्याचा दावा गुगलने केला आहे.
देशभरातील सरकारांकडून गुगल, याहू यासह इतर कंपन्यांकडे विविध युजरची माहितीची विचारणा करणाऱ्या हजारो विनंती येतात. एकट्या गुगलला गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत अमेरिकन सरकार आणि कोर्टाकडून २५ हजारांहून अधिक अकाऊंटबाबतच्या माहितीची विचारणा झाली होती. या व्यतिरिक्तही युजरकडून पाठविले जाणारे मेल, एसएमएसमधील डेटा विविध देशांच्या गुप्तहेर संस्थांकडून गुप्तपणे अॅक्सेस केला जातो. यामुळे जगभरातील युजरच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे जीमेलमार्फत पाठविले जाणारे सर्व मेल एन्क्रिप्ट करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. जीमेलच्या युजरने पाठविलेला आणि स्वीकारलेला प्रत्येक मेल यापुढे एन्क्रिप्टेड असणार आहेत आणि गुगलच्या सर्व्हरमधूनचे ते पाठविले जातील, असा दावा जीमेलच्या सिक्युरिटी इंजिनीअर विभागाचे प्रमुख निकोलस लिडबोरस्की यांनी केला आहे. त्यामुळे हे मेल इतर कुणाला अॅक्सेस करणे अतिशय कठीण होईल.
२०१० मध्येच गुगलने जीमेल युझरला ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी युझरला स्वतः HTTPS असलेली साइट ओपन करावी लागत होती. मात्र आता सर्वच युजरचे मेल अॅटोमॅटिक एन्क्रिप्टेड असणार आहेत. यामुळे एनएसएसह कम्प्युटर हॅकर्सनाही हे मेल अॅक्सेस करणे कठीण होऊन बसेल. मात्र असे असले तरी, एनएसए किंवा इतर देशांच्या सरकारने युजरची माहिती विचारल्यावर गुगलला ती पुरवावी लागणारच आहे.
एनएसएच्या दाव्याप्रमाणे गुगल, याहू, फेसबुक यासारख्या कंपन्यांच्या फायबर ऑप्टिक केबलमधून माहिती अॅक्सेस केली जात होती, हे त्या कंपन्यांनाही ठाऊक होते. मात्र गुगलचा सीईओ लॅरी पेज याने हा दावा खोडून काढला आहे. तरीही असे काही होते आहे किंवा होऊ शकते याचा अंदाज न येण्याइतपत गुगल ही छोटी कंपनी नाही. त्यामुळे इतक्या वर्षानंतर कंपनीला जीमेल सेवा इन्क्रिप्ट केली, हे देखील उशिराचेच शहाणपण म्हणावे लागेल.
मराठीटेक टीप :: त्यासोबतच गूगल two step verification नावाची सुविधा देखील देते ज्याने तुम्हाला तर वेळेस लॉगिन करताना एक एसएमएस येईल ज्यात एक कोड असेल आणि त्या कोडशिवाय लॉगिन पूर्ण होणार नाही
जीमेल झाला 'हॅकप्रूफ'
Reviewed by Sooraj Bagal
on
March 25, 2014
Rating:
No comments: