मायक्रोमॅक्सने लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन कॅनवास नाइट ऑक्टो- कोर चिपसह लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मायक्रोमॅक्स इंटरनेटवर या मोबाइलच्या टिजर व्हिडीओ पोस्ट करत होते. मायक्रोमॅक्सचा हा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी S5ला टक्कर देईल हे निश्चित आहे. गॅलेक्सीS5 प्रमाणेच मायक्रोमॅक्स कॅनवास नाइटमध्येही 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. याचबरोबर हा स्मार्टफोन एक्सपिरिया Z2, HTC One 2 M8 नोकिया आणि मोटोरोलाच्या लेटेस्ट अॅन्ड्राइड मोबाइल्सना टक्कर देईल.
ऑक्टा-कोर असणारा पहिला मोबाइल
कॅनवासच्या टिझर अॅडमध्ये 'The power of Eight' ही कंपनीची टॅगलाइन होती. यानूसार हा स्मार्टफोन ऑक्टा कोर प्रोसेसरवर आधारित असणार हे निश्चित झाले होते. मायक्रोमॅक्सचा हा पहिलाच ऑक्टा- कोर प्रोसेसर असणारा स्मार्टफोन आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास नाइटची डिस्प्ले स्क्रीन 5 इंच आहे. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधी कंपनीने पोस्ट केलेल्या फोटोला 'Beyond High Definition'ही टॅगलाइन दिली होती. यावरून यात 2K रिझल्यूशन असे वाटत होते मात्र कंपनीने यात केवळ फुल एचडी डिस्प्ले दिलेला आहे. या मोबाइलची 5 इंच स्क्रीन 1080x1920 रिझल्यूशन देते. याचबरोबर 443 पिक्सल प्रती इंच एवढी याची डेन्सिटी आहे.
कॅमेरा
लॉन्चिंगपूर्वी सांगितल्याप्रमाणेच यामध्ये 16 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. याचबरोबर 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. ओमिनी व्हिजन कॅमेरा चिप सोबतच यात M8 लारगन लेन्स आहे. कॅमे-याविषयी सागांयचे झाल्यास मायक्रोमॅक्सने आतापर्यंत लॉन्च केलेल्या मोबाइलपैकी या स्मार्टफोनचा कॅमेरा सर्वात जास्त पॉवरफुल आहे.
मेमरी आणि ऑपरेटिंग सिस्टम
कॅनवास नाइटची ऑपरेटिंग सिस्टम 4.2.2 जेलीबीन आहे. आता बाजारात अॅन्ड्राइड किटकॅट 4 ऑपरेटिंग सिस्टम असणारे मोबाइल मिळत असताना हा स्मार्टफोन जून्याच ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
या मोबाइलमध्ये 32GB इंटरनल मेमरी असून एक्सर्टनल मेमरीविषयीची माहिती कंपनीने सांगितलेली नाही.
या मोबाइलमध्य़े 2 GHz चे ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. याशिवाय या स्मार्टफोनची रॅम 2GB आहे. 2350 mAh बॅटरीसोबतच या मोबाइलमध्ये कनेक्टीव्हीटीसाठी 3G,वाय-फाय, ब्ल्यूटूथ पर्याय देण्यात आले आहेत. हा मोबाइल 7.5 तासांचा टॉकटाइम आणि 175 तासांचा स्टॅण्डबाय टाइम देईल असा कंपनीने दावा केला आहे.
रंग
कॅनवास नाइट काळ्या, काळ्या आणि सोनेरी, पांढरा आणि सोनेरी रंगात लॉन्च करण्यात आला आहे.
किंमत
मायक्रोमॅक्सने या मोबाइलची प्री ऑर्डर सुरू केली असून या मोबाइलची किंमत 19,999 रूपये आहे.
Source : Divya Marathi
Source : Divya Marathi
Micromaxने लॉन्च केला Canvas Knight
Reviewed by Sooraj Bagal
on
March 10, 2014
Rating:
No comments: