कॅनॉनने भारतात लॉन्च केला सुपरपिक्चर क्वॉलिटी डीएसएलआर कॅमेरा

कॅनॉनने भारतात लॉन्च केला सुपरपिक्चर क्वॉलिटी डीएसएलआर कॅमेरासुप्रसिद्ध कंपनी 'कॅनॉन'ने भारतीय बाजारात सुपरपिक्चर क्वॉलिटी असलेला डीएसएलआर कॅमेरा लॉन्च केला आहे. 'कॅनॉन ईओएस 1200 डी'ची किंमत 30,995 रूपये आहे. 'ईओएस 1200 डी' हा ग्राहकांच्या बजेटमधील कॅमेरा असल्याचे 'कॅनॉन'च्या सूत्रांनी सांगितले आहे.

कॅनन 'ईओएस 1200डी' हा एक अँट्री लेव्हल डीएसएलआर कॅमेरा असून त्यात 18 मेगापिक्सल एपीएस-सी सीमॉस सेंसर, डिजिक4 प्रोसेसर देण्यात आले आहे. याशिवाय 1080 पिक्सलचे 24 एफपीएससोबत 30एफपीएस फॉर्मेटमध्ये फूल एचडी व्हिडिओ शूट केला जाऊ शकतो. 9 पॉइंट ऑटोफोकस सिस्टिमही देण्यात आली आहे. हीच सिस्टिम कॅनने '1100डी'मध्येही वापरली आहे.

एवढेच नव्हे तर 'ईओएस 1200डी'मध्ये 70 प्रकारचे नन ईएफ लेन्स सपोर्ट करतात. यूजरला फ्रेंडली मेनू तसेच 3 इंचाचा टीएफटी मॉनिटर डिस्प्ले दिला आहे.
कॅनन'ने या कॅमेरामध्ये 18-55 एमएम लेन्स आणि 55 -250 एमएम लेन्स असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहे. या दोन्ही मॉडेलची किंमत क्रमश: 34,995 रूपये आणि 39,995 रूपये आहे.


कॅनॉनने भारतात लॉन्च केला सुपरपिक्चर क्वॉलिटी डीएसएलआर कॅमेरा कॅनॉनने भारतात लॉन्च केला सुपरपिक्चर क्वॉलिटी डीएसएलआर कॅमेरा Reviewed by Sooraj Bagal on April 02, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.