गोव्यातील एका इव्हेंटमध्ये 'जिओनी'चा नवा स्मार्टफोन लॉन्च झाला. नुकतेच बाजारात लॉन्च झालेले लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनला हा फोन टक्कर देऊ शकतो असे बोलले जात आहे. जिओनी S5.5 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. जिओनीची जाडी अॅपल आयफोन 5S ( 7.6 mm) पेक्षा कमी आहे. दरम्यान, या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसोबत जिओनी कंपनीने भारतीय बाजारात पदार्पण केले आहे. 22,000 रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन मायक्रोमॅक्स कॅनवास नाइटला टक्कर देऊ शकतो.
डिस्प्ले-
पाच इंचाचा स्क्रीन असलेला जिओनीचा स्मार्टफोन 1080X1920 पिक्सलचे डिस्प्ले रेझोल्यूशन देतो. या फोनचा स्क्रीन टाईप AMOLED आहे. विशेष म्हणजे S5.5ची 441 पिक्सल एवढी डेन्सिटी आहे. आयफोन 5S (326 पिक्सल प्रति इंच) पेक्ष ही जास्त आहे. जास्त पिक्सलची डेन्सिटी असल्यामुळे उन्हात वापरला तरी युजर्सला कोणतीही अडचण येणार नाही. जिओनीचा हा स्मार्टफोन मल्टीटच सपोर्ट करतो. S5.5चा स्क्रीन 16 मिलियन कलर डिस्प्ले करु शकतो.
कॅमेरा-
जिओनीच्या हा स्मार्टफोन 13 मेगापिक्सलच्या कॅमेराने अद्ययावत आहे. S5.5चा कॅमेरा 4160 x 3120 पिक्सल रेझोल्यूशनचे फोटोज क्लिक करू शकतो. ऑटोफोकससह LED फ्लॅश सुविधा यात देण्यात आली आहे.
अन्य कॅमेरा फीचर्स-
* जिओ टॅगिंग
* टच फोकस
* फेस आणि स्माइल डिटेक्शन
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* HD व्हिडिओ रिकॉर्डिंग
प्रोसेसर आणि पॉवर-
1.7 GHzचे ऑक्टा-कोर पॉवरफुल प्रोसेसर
2 GB रॅम
HD व्हिडिओ गेमिंग
2300 mAh ची पॉवरफूल बॅटरी
'जिओनी'ने भारतात लॉन्च केला जगातील सगळ्यात स्लिम स्मार्टफोन
Reviewed by Sooraj Bagal
on
April 04, 2014
Rating:

No comments: