अवघ्या 30 सेकंदात स्मार्टफोनची बॅटरी चार्ज होणार ?

सध्या बहुतेकांजवळ स्मार्टफोन आहेत. मात्र या स्मार्ट फोन्सची बॅटरी डाऊन होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे अशा स्मार्ट म्हणवणाऱ्या फोन्सना युझर्स वैतागले आहेत. पण आता अशा फोनसाठी एक नवी बॅटरी बनवण्यात आली आहे.ही बॅटरी अवघ्या 30 सेकंदात चार्ज होईल, असा दावा करण्यात आला आहे. इस्राईलच्या एका कंपनीने ही बॅटरी बनवली आहे. ‘स्टोरडॉक’ असं या कंपनीचं नाव आहे. 


या बॅटरीसाठी खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ध्या मिनिटाच्या आत मोबाईलची बॅटरी चार्ज होऊ शकेल. या बॅटरीचं वैशिष्ट्य म्हणजे, ज्या वेगाने ही बॅटरी चार्ज होते, त्या वेगाने डिस्चार्ज होत नाही. बॅटरीचा बॅक-अपही जास्त असेल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 
ही बॅटरी अजून बाजारात आलेली नाही. तसंच या बॅटरीची किंमत काय असेल, याबाबतही कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र या बॅटरीसाठी स्मार्टफोन युझर्स नक्कीच रांगा लावतील, अशी आशा कंपनीला आहे.


अवघ्या 30 सेकंदात स्मार्टफोनची बॅटरी चार्ज होणार ? अवघ्या 30 सेकंदात स्मार्टफोनची बॅटरी चार्ज होणार ? Reviewed by Sooraj Bagal on April 22, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.