फेसबुकवर आपली आणि इतरांकडून आलेली पोस्ट, फोटो शेअर करणे हा सर्वच नेटयुझर्सचा आवडता छंद असतो. या माहितीमध्ये विविध प्रकारचे फोटोज आणि मजकुराचाही समावेश असतो. मात्र, कोणत्या फोटोला किती लाईक मिळतील, कोणता फोटो किती वेळा शेअर होईल, हे आतापर्यंत निश्चित सांगता येत नव्हते. मात्र, आता त्याचीही माहिती आगाऊ मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या फोटोला कितीजण शेअर करतील, याचा अंदाज तुम्हाला आधीच करता येणार आहे.
फेसबुकवर दररोज लाखो फोटो अपलोड होतात आणि ते तितक्याच वेगाने शेअरही केले जातात. अशा एकापेक्षा अधिक वेळा शेअर केल्या जाणाऱ्या फोटो आणि व्हिडीओसाठी स्टॅन्डफर्डच्या संशोधकांनी 'कॅसकेड' अशी संज्ञा वापरली आहे. फेसबुकला डाटा उपलब्ध करून देणाऱ्या संशोधकांना 'कॅसकेड'बाबत मजेशीर माहिती आढळली. या संशोधकांनी स्टॅन्डफर्ड युनिर्व्हसिटीसोबत केलेल्या संशोधनात त्यांना असे आढळले की युझर्सकडून २० पैकी एकच फोटो फेसबुकवर अपलोड केला जातो आणि चार हजारपैकी एक फोटो तब्बल ५०० वेळा शेअर केला जातो. तसेच दहापैकी आठ फोटो (कॅसकेड) दोन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा शेअर केले जातात. त्यामुळे ते दुप्पट गतीने शेअर होत जातात, असे या संशोधकांनी कोरियात झालेल्या इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंटेशनमध्ये मांडले आहे. यासाठी त्यांनी तब्बल दीड लाख फोटो बघितले. यातील प्रत्येक फोटो किमान पाच वेळा शेअर झाल्याचे संशोधनकर्त्यांना आढळून आले.
एखादी अनोखी माहिती फेसबुकवर टाकल्यास ती शेअर करण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के असल्याचे स्टॅन्डफर्डच्या संशोधकांना दिसले. 'स्टॅन्डफर्ड'च्या या अनोख्या टूलमुळे फेसबुकवर शेअर केले जाणारे फोटो आणि व्हिडिओची अचूक माहिती मिळेल. विविध निकषांच्या आधारावर त्यांनी केलेल्या या अभ्यासात सुमारे ८० टक्के अंदाज अचूक हेरण्यात त्यांनी यश आले. जेवढे फोटो शेअर करण्याचे प्रमाण अधिक तेवढे त्याच्या अंदाजातील अचूकपणा अधिक येत असल्याचे आढळले. शंभरपेक्षा अधिकवेळा एखादा फोटो शेअर झाला असेल तर त्यांचे ८८ टक्के अंदाज बरोबर असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

कोणत्या फोटोला सर्वाधिक 'लाईक'?
Reviewed by Sooraj Bagal
on
April 09, 2014
Rating:
No comments: