अलीकडे सादर होत असलेल्या फोन्समध्ये जवळपास काहीच नावीन्य नसतं. थोडेफार फीचर्स कमीजास्त करून वेगवेगळ्या कंपन्या सादर करत राहतात. गेल्या काही महिन्यापासून मात्र परिस्थिति बदलत असून आता अधिक सुरक्षित आणि VR सारख्या तंत्रज्ञानाला समोर ठेऊन फोन्सची निर्मिती केली जात आहे. यातच नवा प्रकार जन्माला येत आहे तो म्हणजे मोड्युलर फोन्स ! तर आज पाहूया मोड्यूलर फोन्स म्हणजे काय आणि इतर नव्या घडामोडी ...
मोड्यूलर फोन म्हणजे काय ? : आपण आपल्या कम्प्युटर पीसी मध्ये एखादी गोष्ट स्लो/खराब झाली तर तो भाग सहज बदलून नवा टाकू शकतो. अर्थात ही गोष्ट लॅपटॉपच्या बाबतीत मात्र कमी आढळते कारण बर्यापैकी पार्ट्स हे फिक्स बसवून टाकलेले असतात. त्याचप्रमाणे आपले सध्याचे फोनचे पार्ट्स आपण ताकद वाढवण्यासाठी बदलू शकत नव्हतो. मात्र आता येत असलेल्या मोड्युलर फोन्समध्ये आपण नवे पार्ट्स जोडू शकतो नवं हार्डवेअर जोडून अधिक वेळ चालणारा अधिक ताकद असलेला फोन बनवू शकतो !
समजा तुम्हाला तुमच्या फोनला अधिक बॅटरी हवी आहे. लगेच एक Battery Mod भाग विकत घ्या आणि फोनला जोडा की झाल काम ! गूगलचा प्रोजेक्ट ARA, प्रोजेक्ट टँगो, फोनब्लॉक्स,एलजी जी5 हे प्रकल्प सध्या मोड्युलर फोनच्या स्पर्धेत सहभागी आहेत.
मोटो झेड हा लेनेवोने सादर केलेला फोन यामध्ये सध्या फोनला प्रॉजेक्टर, जेबीएलचे स्पीकर्स, बॅटरी पॅक जोडता येतो ! तसेच आपण स्वतः बनवलेले पार्ट्स सुद्धा जोडू शकतो !
मोटो झेड : मोटोरोला ही कंपनी आता लेनेवोकडे आहे. त्यांनी हा नवा फोन एका नवी सिरीजमध्ये आणलाय. एकदम पातळ डिजाइन (केवळ 5.19mm)असून ह्यामध्ये नेहमीचा 3.5mm Headphone Jack नसून नव्या प्रकारचा USB Type C जॅक असेल. LeEco नंतर हा फोन आहे ज्याने नेहमीचा हेडफोन जॅक न वापरता नवा टाइप सी पोर्ट वापरला आहे! आता आयफोनसुद्धा हाच जॅक वापरेल असा अंदाज आहे.
मोटो झेड आणि मोटो झेड फोर्स हे दोन नवे फोन या सेरीजमध्ये आले आहेत.
या फोनला Moto Mods नावाचे भाग बाहेरून जोडता येतात ज्याद्वारे आपण या फोनला मोठा प्रॉजेक्टर बनवू शकतो, JBL स्पीकर्स बसवू शकतो, बॅटरी वाढवू शकतो !
मोटो झेड फीचर्स :
लेनेवो टँगो फोन : यासोबत लेनेवोने गूगलसोबत टँगो नावाच्या प्रकल्पांतर्गत Phab2 Pro नावाचा फोन सादर केलाय . ह्या फोनमध्ये 3D मॅपींगची ताकद असून औग्मेंटेड रियालिटीचा वापर हा फोन करतो !! हासुद्धा फोनच्या जगात नावच प्रकार असून याद्वारे आपल स्वतःच आभासी जग आणि खर आयुष्य एकत्र करता येतील. आपण यातून ग्रह, सौरमंडळ अनुभवू शकतो! हे तंत्र नक्की काय आहे समजण्यासाठी खालील तीन व्हिडिओ पहावेच लागतील...
लेनेवोने याच कार्यक्रमात गुंडाळता येणार्या फोनचा डेमो दिला. भविष्यात येणार्या तंत्रज्ञानाची झलक आताच दिसत असून हा फोन चक्क हातामध्ये गुंडाळून घड्याळ्यासारखा वापरता येतो. सोबतच त्यांनी असा टॅब्लेट दाखवला ज्याची घडी घालता येते. हा टॅब्लेट निम्म्यामध्ये दुमडून फोनसारखा वापरुन लगेच पुन्हा सरळ करून टॅब्लेट सारखा पाहता येतो !!!
इतर घडामोडी :
Update : मोटो झेड भारतात उपलब्ध : अॅमॅझोन लिंक : http://amzn.to/2dIFgIZ
![]() |
| Project ARA : Modular Phone |
समजा तुम्हाला तुमच्या फोनला अधिक बॅटरी हवी आहे. लगेच एक Battery Mod भाग विकत घ्या आणि फोनला जोडा की झाल काम ! गूगलचा प्रोजेक्ट ARA, प्रोजेक्ट टँगो, फोनब्लॉक्स,एलजी जी5 हे प्रकल्प सध्या मोड्युलर फोनच्या स्पर्धेत सहभागी आहेत.
मोटो झेड हा लेनेवोने सादर केलेला फोन यामध्ये सध्या फोनला प्रॉजेक्टर, जेबीएलचे स्पीकर्स, बॅटरी पॅक जोडता येतो ! तसेच आपण स्वतः बनवलेले पार्ट्स सुद्धा जोडू शकतो !
मोटो झेड : मोटोरोला ही कंपनी आता लेनेवोकडे आहे. त्यांनी हा नवा फोन एका नवी सिरीजमध्ये आणलाय. एकदम पातळ डिजाइन (केवळ 5.19mm)असून ह्यामध्ये नेहमीचा 3.5mm Headphone Jack नसून नव्या प्रकारचा USB Type C जॅक असेल. LeEco नंतर हा फोन आहे ज्याने नेहमीचा हेडफोन जॅक न वापरता नवा टाइप सी पोर्ट वापरला आहे! आता आयफोनसुद्धा हाच जॅक वापरेल असा अंदाज आहे.
मोटो झेड आणि मोटो झेड फोर्स हे दोन नवे फोन या सेरीजमध्ये आले आहेत.
या फोनला Moto Mods नावाचे भाग बाहेरून जोडता येतात ज्याद्वारे आपण या फोनला मोठा प्रॉजेक्टर बनवू शकतो, JBL स्पीकर्स बसवू शकतो, बॅटरी वाढवू शकतो !
- प्रॉसेसर : quad-core Qualcomm Snapdragon 820 2.2GHz
- रॅम : 4GB स्टोरेज :
- डिस्प्ले : 5.5-inches quadHD (535 pixels per inch).
- कॅमेरा : मागचा 12 मेगापिक्सेल f/1.8 OIS, पुढचा 5 मेगापिक्सेल
- बॅटरी : 2600mAh
- झेड फोर्स मध्ये झेड सारखीच फीचर्स असून बॅटरी 3500mAh ची आणि कॅमेरा 21 एमपी आहे!
मोटो मोड्सचा यूट्यूब व्हिडिओ : लिंक
लेनेवो टँगो फोन : यासोबत लेनेवोने गूगलसोबत टँगो नावाच्या प्रकल्पांतर्गत Phab2 Pro नावाचा फोन सादर केलाय . ह्या फोनमध्ये 3D मॅपींगची ताकद असून औग्मेंटेड रियालिटीचा वापर हा फोन करतो !! हासुद्धा फोनच्या जगात नावच प्रकार असून याद्वारे आपल स्वतःच आभासी जग आणि खर आयुष्य एकत्र करता येतील. आपण यातून ग्रह, सौरमंडळ अनुभवू शकतो! हे तंत्र नक्की काय आहे समजण्यासाठी खालील तीन व्हिडिओ पहावेच लागतील...
- Turn your world into Playground
- Tango: See more with a new kind of phone
- Tango: Re-imagine space around you.
![]() |
| Lenovo Tango Phab2 Pro |
![]() |
| Lenovo Bendable Phone and Tablet |
- काही दिवसांपूर्वीच फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचं ट्विटर आणि पिनटरेस्ट अकाऊंट हॅक झाल होत! याआधी झालेल्या linkedin च्या पासवर्ड लिक मधून हॅकर्सने पासवर्ड मिळवून मार्कच अकाऊंट चक्क हॅक केल ! आणि आश्चर्य म्हणजे त्याने त्याच्या खात्यांचा पासवर्ड "dadada" हा ठेवला होता !!!!
- LeEco ने निर्माण केलीय मोठी स्पर्धा LeEco Le 2 आणि LeMax 2 होत आहेत यशस्वी !
- अमाझोनने केलीये भारतीय साइटवर तब्बल 3 बिलियन डॉलरची गुंतवणूक, भारतासाठी मोठी योजना तयार!
Update : मोटो झेड भारतात उपलब्ध : अॅमॅझोन लिंक : http://amzn.to/2dIFgIZ
मोटो झेड, पहिला टँगो फोन, गुंडाळता येणारा फोन आणि इतर
Reviewed by Sooraj Bagal
on
June 10, 2016
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
June 10, 2016
Rating:

No comments: