![]() |
| Prisma अॅप मध्ये इफेक्ट दिलेले फोटोज |
डाऊनलोड लिंक : Prisma on Google Playगेला महिनाभर हे अॅप केवळ iOS वरच उपलब्ध होते मात्र आता अँड्रॉइडसाठी प्ले स्टोअर वरसुद्धा दाखल झाले आहे. यामध्ये Munk, पाब्लो पिकासो, Van Gogh, Levitan या महान चित्रकारांच्या चित्रांचा इफेक्ट अगदी सहज देता येतो. प्रिझ्माच्या वेबसाइटच्या दाव्यानुसार, हे अॅप न्युरल नेटवर्क आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विलक्षण जोडणी तयार करतं ! यामध्ये Impression, Curtain, Running in Storm, Mondrian, Tears, Composition असे विविध फिल्टर्स आहेत.
ज्यावेळी प्रिझ्मा अॅप तुमच्या फोटोला कलाकृतीमध्ये बदलतं तेव्हा थोडा वेळ घेतं कारण ते फोटोला स्वतः बर्यापैकी समजून किती प्रमाणात फिल्टर लावायचा हे ठरवतं. आपण स्वतः फिल्टर किती प्रमाणात लावला गेलाय तीव्रता कमी जास्त करू शकतो! मशीन लर्निंग नावाच्या आणि Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) यांच्या जोरावर तंत्रज्ञान आणखी वेगाने पुढे सरकत आहे हे नक्की !
हे अॅप 11 मिलियन वेळा डाऊनलोड केलं गेलय आणि अंदाजे 400 मिलियन फोटोजना यामुळे इफेक्ट देण्यात आले आहेत ! यामधून तयार केलेली कलाकृती आपण लगेच फेसबुक इंस्टाग्राम, व्हॉटसअॅपवर लगेच शेअर करू शकतो. खाली काही प्रसिद्ध माध्यमांचे रिव्यूज :
- Verge : "Prisma will make you fall in love with photo filters all over again"
- TechCrunch : "Artists beware! AI is coming for your paintbrush too…"
- Mashable : "Turning photos into artistic works of inspiration just got a lot easier"
आलिया भट, जॉन अब्राहम, शाहीद कपूर, अनुष्का शर्मा, सिद्धार्थ चांदेकर, क्रांती व तेजस्विनी, प्रसाद ओक
प्रिझ्मा (Prisma) : खर्याखुर्या चित्राचा इफेक्ट देणारा फोटो एडिटर
Reviewed by Sooraj Bagal
on
July 25, 2016
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
July 25, 2016
Rating:


No comments: