गूगलच्या खास भारतासाठी आयोजित गूगल फॉर इंडिया या कार्यक्रमाच्या तिसर्या पर्वात त्यांनी अनेक नव्या गोष्टींची घोषणा केली. भारतीय वापरकर्त्यांची गरज ओळखून व अधिकाधिक लोकांना इंटरनेट, स्मार्टफोन्स वापरता यावेत या उद्देशाने या नव्या उत्पादनांची घोषणा केल्याच यावेळी सांगण्यात आलं.
गूगल मॅप्सवर दुचाकी (Two Wheeler) मोड, गूगल तेजमध्ये बिल भरण्याची सोय, अँड्रॉइड ओरीओ गो, गूगल गो, फाईल्स गो, जिओफोनवर गूगल असिस्टंट या सर्वांबद्दल जाणून घ्या आजच्या या लेखात...
अँड्रॉइड ओरीओ गो : कमी रॅम व कमी स्टोरेज असलेल्या फोन्सना शक्यतो जे सर्वात नवं अँड्रॉइडची आवृत्ती (version) असतं ते मिळत नाही. मात्र आता ही उणीव भरून काढण्यासाठी गूगलने अँड्रॉइड ओरीओ 8.1 ची अँड्रॉइड ओरीओ गो नावाने आवृत्ती आणली असून त्यामुळे कमी किंमतीच्या/ जुन्या हार्डवेअर असलेल्या फोन्सवर सुद्धा सगळ्यात नव्या अँड्रॉइडचा आनंद घेता येईल!
512MB ते 1GB रॅम असलेल्या फोनवर अधिक चांगला वापर होईल या दृष्टीने केलेले बदल असतील सोबत
गूगल गो, गूगल असिस्टंट फॉर अँड्रॉइड ओरीओ गो सुद्धा जोडलेला असेल! या अँड्रॉइडमधील प्ले स्टोर देखील या फोन्ससाठी योग्य असे अॅप्सच सुचवेल! ही आवृत्ती २०१८ च्या सुरुवातीला उपलब्ध होईल. अधिक माहिती
गूगल गो : कमी क्षमतेच्या फोन्ससाठी आता गूगल अॅपची स्वतंत्र आवृत्ती गूगल गो या अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असून हे नवं अॅप कमी जागा, कमी इंटरनेट वापर करत गूगल सर्च रिझल्ट्स दाखवेल!
प्रथमच इंटरनेटचा वापर सुरु करणाऱ्या यूजर्सना समोर ठेऊन या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
या अॅपची साईझ 5 MB पेक्षा कमी आहे आणि यामुळे सर्चसाठी ४०% इंटरनेट डेटा वाचेल! भारत आणि इंडोनेशियामधील वापरकर्त्यांसाठी हे अॅप चाचणी स्वरूपात उपलब्ध झालं आहे!
फाईल्स गो : फोनवर जागा मोकळी करा! या नव्या अॅपमुळे फोनवर गरज नसलेल्या फाईल्स काढून टाकणे, जुने-कमी गुणवत्तेचे फोटो, व्हॉटसअॅपचे गरज नसलेले फोटो काढून टाकणे, फोनचं स्टोरेज तपासणे, फाईल्स शोधणे अशा सुविधांचा उपयोग करता येईल! डाउनलोड लिंक : Files Go on Google Play
हे अॅप शेअरइट सारखे वापरण्यासाठी Files पर्याय निवडा मग Send त्यानंतर पाठवायची असलेली फाईल निवडा आणि Send करा. ज्यांना पाठवायची आहे त्यांना Receive करायला सांगा. Connect करा आणि फाईल ट्रान्सफर सुरु होईल! (यासाठी दोघांकडे Files Go हे अॅप असायला हवं)
गूगल असिस्टंट आता जिओफोनवर! : भारतासाठी खास प्रथमच गूगल असिस्टंट एका फिचर फोनवर उपलब्ध करून देण्यात आला आहे! जिओफोनवर हा आल्यामुळे इंग्लिश, हिंदी भाषांचा वापर करत या असिस्टंटसोबत संवाद साधून उत्तरे मिळवता येणार आहेत! फोन कॉल्स करणे, गाणी/चित्रपट लावणे,इंटरनेटवर शोध घेणे अशी कामे हा असिस्टंट करू शकतो. Myntra, एसबीआय, बुकमायशो, गोआयबिबो, एचडीएफसी अशा अॅप्सचा समावेश आता गूगल असिस्टंट अॅक्शन्समध्ये करण्यात आला आहे!
गूगल मॅप्सवर दुचाकी मोड! (Two Wheeler Mode) : गूगल मॅप्स वापरताना पूर्वी सायकल, कार, कॅब आणि बस/रेल्वे अशा सार्वजनिक वाहतुकीचेच पर्याय होते, मात्र आता दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पर्याय देण्यात आला असून यामुळे दुचाकी प्रवास आणखी सोपा होईल. ही सुविधासुद्धा भारतात प्रथम आणली गेली असून यामुळे कारसारख्या वाहनांना उपलब्ध नसलेले शॉर्टकट्स सुद्धा दाखवेल!
गूगल तेजवर बिल भरणा : सध्या केवळ पैसे पाठवण्या/स्वीकारण्यापर्यंतच मर्यादित असलेली गूगल तेज हि UPI सेवा आता ७० हुन अधिक प्रकारची बिलं भरण्यासाठी वापरता येईल! गॅस, वीज, ब्रॉडबँड, DTH या सर्वांची बिलं भरता येतील. याबरोबर एकदा बिल भरल्यास पुढच्या वेळी गूगल तुम्हाला बिल भरण्यासाठी आठवण करून देत राहील! एक कोटीहुन अधिक लोक आता गूगल तेजचा वापर करत असून चौदा कोटी व्यवहार केले गेले आहेत! गूगल तेज डाउनलोड लिंक : Google Tez
यावेळी काही इतर गोष्टींबद्दल माहिती दिली गेली जसे की इंटरनेट साथी या महिलांना इंटरनेट वापरास मदत करणाऱ्या उपक्रमाबद्दल, काही भारतीय स्टार्टअप्समध्ये गूगलने केलेली गुंतवणूक, रेलवायर या रेल्वे स्टेशन्सवरील वायफाय सेवेबद्दल सोबत काही बिझनेस ग्राहकांना उपयोगी ठरलेली उत्पादने, भारतात यूट्यूबचा वाढलेला वापर.
search terms Google for India Android Oreo Go Google Go Files Go Google Maps Two Wheeler Mode Google Tez Bill Payments Google Assistant JioPhone
गूगल मॅप्सवर दुचाकी (Two Wheeler) मोड, गूगल तेजमध्ये बिल भरण्याची सोय, अँड्रॉइड ओरीओ गो, गूगल गो, फाईल्स गो, जिओफोनवर गूगल असिस्टंट या सर्वांबद्दल जाणून घ्या आजच्या या लेखात...
अँड्रॉइड ओरीओ गो : कमी रॅम व कमी स्टोरेज असलेल्या फोन्सना शक्यतो जे सर्वात नवं अँड्रॉइडची आवृत्ती (version) असतं ते मिळत नाही. मात्र आता ही उणीव भरून काढण्यासाठी गूगलने अँड्रॉइड ओरीओ 8.1 ची अँड्रॉइड ओरीओ गो नावाने आवृत्ती आणली असून त्यामुळे कमी किंमतीच्या/ जुन्या हार्डवेअर असलेल्या फोन्सवर सुद्धा सगळ्यात नव्या अँड्रॉइडचा आनंद घेता येईल!
512MB ते 1GB रॅम असलेल्या फोनवर अधिक चांगला वापर होईल या दृष्टीने केलेले बदल असतील सोबत
गूगल गो, गूगल असिस्टंट फॉर अँड्रॉइड ओरीओ गो सुद्धा जोडलेला असेल! या अँड्रॉइडमधील प्ले स्टोर देखील या फोन्ससाठी योग्य असे अॅप्सच सुचवेल! ही आवृत्ती २०१८ च्या सुरुवातीला उपलब्ध होईल. अधिक माहिती
![]() |
| Google Go |
प्रथमच इंटरनेटचा वापर सुरु करणाऱ्या यूजर्सना समोर ठेऊन या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
या अॅपची साईझ 5 MB पेक्षा कमी आहे आणि यामुळे सर्चसाठी ४०% इंटरनेट डेटा वाचेल! भारत आणि इंडोनेशियामधील वापरकर्त्यांसाठी हे अॅप चाचणी स्वरूपात उपलब्ध झालं आहे!
Google Go Download Link : https://g.co/googlego
![]() |
| Files Go |
हे अॅप शेअरइट सारखे वापरण्यासाठी Files पर्याय निवडा मग Send त्यानंतर पाठवायची असलेली फाईल निवडा आणि Send करा. ज्यांना पाठवायची आहे त्यांना Receive करायला सांगा. Connect करा आणि फाईल ट्रान्सफर सुरु होईल! (यासाठी दोघांकडे Files Go हे अॅप असायला हवं)
वायफायद्वारे इंटरनेटशिवाय फाईल्स पाठ्वण्यासाठी फाईल्स गो अॅप शेअरइट, झेंडर अशा अॅपला पर्याय म्हणूनसुद्धा वापरता येईल!
![]() |
| Google Assistant on JioPhone |
![]() |
| Two Wheeler mode on Google Maps |
यापूर्वी पुण्यात दुचाकी वाहनांना बंदी असलेल्या लकडी पूल/ संभाजी पूल ठिकाणी गूगल मॅप्स मुळे बऱ्याच जणांची फसगत व्हायची मात्र आता या मोडमध्ये वेगळा रस्ता दाखवला जातोय!
गूगल तेजवर बिल भरणा : सध्या केवळ पैसे पाठवण्या/स्वीकारण्यापर्यंतच मर्यादित असलेली गूगल तेज हि UPI सेवा आता ७० हुन अधिक प्रकारची बिलं भरण्यासाठी वापरता येईल! गॅस, वीज, ब्रॉडबँड, DTH या सर्वांची बिलं भरता येतील. याबरोबर एकदा बिल भरल्यास पुढच्या वेळी गूगल तुम्हाला बिल भरण्यासाठी आठवण करून देत राहील! एक कोटीहुन अधिक लोक आता गूगल तेजचा वापर करत असून चौदा कोटी व्यवहार केले गेले आहेत! गूगल तेज डाउनलोड लिंक : Google Tez
यावेळी काही इतर गोष्टींबद्दल माहिती दिली गेली जसे की इंटरनेट साथी या महिलांना इंटरनेट वापरास मदत करणाऱ्या उपक्रमाबद्दल, काही भारतीय स्टार्टअप्समध्ये गूगलने केलेली गुंतवणूक, रेलवायर या रेल्वे स्टेशन्सवरील वायफाय सेवेबद्दल सोबत काही बिझनेस ग्राहकांना उपयोगी ठरलेली उत्पादने, भारतात यूट्यूबचा वाढलेला वापर.
search terms Google for India Android Oreo Go Google Go Files Go Google Maps Two Wheeler Mode Google Tez Bill Payments Google Assistant JioPhone
गूगल फॉर इंडिया : गूगल गो, मॅप्सवर दुचाकी मोड, फाइल्स गो सादर
Reviewed by Sooraj Bagal
on
December 06, 2017
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
December 06, 2017
Rating:

Nice Article, Best Tech Blog in Marathi...
ReplyDeletethis will be good Website in Marathi for all tech news
Google for India is nice initiative. Android Oreo Go how to get it ? will it be for older phones too?
ReplyDeleteगुगलनं काय नविन काढलयं याची अद्ययावत माहिती देणं म्हणजे आमच्यासाठी तुम्हीच गुगल ! वा छान
ReplyDelete