व्होडाफोनची तरुण ग्राहकांसाठी नवी ऑफर : अॅमॅझॉन प्राइम ४९९ रुपयात!


व्होडाफोनने खास तरुण ग्राहकांसाठी नवी ऑफर (Youth Offer on Prime) आणली असून यामध्ये अॅमॅझॉन प्राइम या सेवेचं सबस्क्रिप्शन ४९९ रुपयात मिळेल! (एरवी इतर ग्राहकांना ९९९ रुपयात मिळतं) ही ऑफर फक्त १८ ते २४ वयोगटातील तरुणांसाठी आहे. प्राईम ग्राहकांना अॅमॅझॉनच्या वेबसाइटवर मोफत डिलिव्हरी, प्राईम व्हिडीओ द्वारे चित्रपट/मालिका/ गाणी/कार्यक्रम पाहता येतात. यासोबत खास सेल असणाऱ्या दिवशी प्राईम ग्राहकांना प्राधान्य मिळतं!
१६ जुलै पूर्वी या ऑफरचा लाभ घेणार्यांना प्राईम डेचा आनंद घेता येईल! १६ जुलै व १७ जुलै अॅमॅझॉनच्या सर्व वेबसाईटवर मोठ्या ऑफर्स असणार आहेत. (१६ दुपारपासून १७ च्या रात्रीपर्यंत)      

ही ऑफर मिळवण्यासाठी व्होडाफोन ग्राहक MyVodafone अॅप मध्ये जाऊन ४९९ रुपये ऑनलाइन पेमेंट करून amazon.in ला भेट देऊन अॅक्टिवेट करायची आहे. ज्यामुळे एक वर्ष प्राइम सेवेचा लाभ घेता येईल!
MyVodafone on Google Play     
search terms vodafone amazon prime offer  youth offer
व्होडाफोनची तरुण ग्राहकांसाठी नवी ऑफर : अॅमॅझॉन प्राइम ४९९ रुपयात! व्होडाफोनची तरुण ग्राहकांसाठी नवी ऑफर : अॅमॅझॉन प्राइम ४९९ रुपयात! Reviewed by Sooraj Bagal on July 06, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.