होय नवा अॅपल आयफोन आला की तो सर्वात आधी माझ्याकडेच असावा या उद्देशाने बरेच लोक अॅपल स्टोअरबाहेर रांगा लावतात. ही रांग बराच वेळ चाललेली असते दरम्यान स्मार्टफोन विश्वातील आणखी एक आघाडीची कंपनी हुवावेने सिंगापूर येथे रांगेत थांबलेल्या iPhone XS घेणाऱ्या अॅपल ग्राहकांना चक्क पॉवरबॅंक्स वाटल्या! आणि त्यावर अस लिहून दिलं कि 'तुम्हाला याची गरज पडेल!'
सोबत हुवावेनेच लंडनमध्ये एक ज्यूस व्हॅन उभी केली ! जिथे ज्यूस आणि चार्जिंग पोर्ट्स उपलब्ध करून दिली होती! पॉवरबॅंक्ससुद्धा थोड्याथोडक्या नव्हे तर 10000mAh च्या होत्या! यावर कंपनीची प्रतिक्रिया विचारताच तशा हवामानात रांगेत वाट पाहणं सुसह्य व्हावं ह्या उद्देशाने या पॉवरबँक दिल्याचं सांगण्यात आलं!

search terms : apple fans queue up for new iPhone XS
नव्या आयफोनसाठी रांगेत थांबलेल्या अॅपल ग्राहकांना हुवावेकडून पॉवरबँक्स, ज्यूस!
Reviewed by Sooraj Bagal
on
September 22, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
September 22, 2018
Rating:



No comments: