विवोकडून आज त्यांच्या V मालिकेतील V11 Pro हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सादर केलेला विवो नेक्स स्मार्टफोन, त्यातील नवीन गोष्टी जश्या की पुढील बाजूस पूर्णत: डिस्प्ले, डिस्प्लेखालीच फिंगरप्रिंट, फोनमधून वर येणारा फ्रंट कॅमेरा यांमुळे चर्चेचा विषय बनला होता.
V11 Pro मध्ये सुद्धा डिस्प्लेखालीच फिंगरप्रिंट स्कॅनरचा समावेश असून कमी आकारातील नॉच आहे त्याचबरोबर खूपच लहान बेझल असतील. ९१.२७% स्क्रीन टू बॉडी रेशो, नेक्सच्या तुलनेत ५०% अधिक अचूक इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल पिक्सेल सेन्सर, बोके इफेक्ट, AI फेस अनलॉक, FunMoji, फास्ट चार्जिंग यांसारखे फिचर्स यामध्ये आहेत.
२०१७ ते २०१८ च्या दुसऱ्या तिमाही पर्यंत विवो मार्केट शेअरनुसार पहिल्या दोन ब्रँडमध्ये असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. V11 Pro हा सुद्धा मेड इन इंडिया अंतर्गत असून ग्रेटर नोएडा मधील फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चर केला जाईल.

V11 Pro Specifications
डिस्प्ले : 6.41 inch (2340х1080) FHD+ 19.5:9 FullView Display 3.0प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 660 AIE Octa Core
रॅम : 6GB
स्टोरेज : 64GB (Expandable Upto 256GB)
बॅटरी : 3400 mAh Battery with Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Funtouch OS 4.5 (Based on Android Oreo 8.1)
कॅमेरा : 12MP + 5MP (f/1.8 + f/2.4) Dual Pixel Rear Camera
फ्रंट कॅमेरा : 25MP (f/2.0)
रंग : Starry Night, Dazzling Gold
सेन्सर : In-Display Fingerprint Scanner, Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, E-compass,
इतर : USB 2.0, Dual Sim + MicroSD Card slot, 3.5mm Audio Jack, Bluetooth 5.0, 2.5 D Glass, GPS/GLONASS/Beidou
किंमत – ₹२५,९९०
लिंक - Amazon / V11 Pro
व्हिडीओ : https://youtu.be/TlG4zZu1amk१२ सप्टेंबर रोजी पहिला सेल असून आजपासून प्री बुकसाठी अॅमॅझॉन व विवो इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. याबरोबरच खरेदीवर HDFC बँकेतर्फे २००० कॅशबॅक, जिओतर्फे ऑफर तसेच स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर यांचा समावेश आहे.
विवो V11 Pro सादर : डिस्प्लेखालीच फिंगरप्रिंट असलेला आणखी एक फोन!
Reviewed by Swapnil Bhoite
on
September 07, 2018
Rating:
Reviewed by Swapnil Bhoite
on
September 07, 2018
Rating:


No comments: