
पोकोने काही दिवसांपूर्वीच जगभरात ७ लाख हुन अधिक F1 फोन विकले असल्याचं जाहीर केलं आहे!Poco F1 च्या नव्या किंमती :
6GB + 64GB : ₹ १९,९९९
6GB + 128GB : ₹ २२,९९९
8GB + 256GB : ₹ २७,९९९
8GB + 256GB : ₹ २८,९९९ (Armored)
आता या फोनला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या नव्या अँड्रॉइड ९ पाय आवृत्तीवर आधारित MIUI10 अपडेट उपलब्ध झालं आहे! यामध्ये अनेक नव्या सोयी जोडण्यात आल्या असून हा फोन आता स्वस्त फोन्समध्ये आणखी एक उत्कृष्ट पर्याय ठरला आहे ज्याच्या किंमतीला जवळपास दुसऱ्या कुठल्याच कंपनीचा पर्याय नाहीय!
या अपडेटची साईज 1.7GB असल्याच सांगण्यात येत आहे. हे अपडेट हळूहळू सर्व फोन्सवर पोहोचवलं जाणार असून याची सुरुवात काल करण्यात आली आहे.
पोको F1 आता आणखी स्वस्त : अँड्रॉइड ९ पाय अपडेट उपलब्ध!
Reviewed by Sooraj Bagal
on
December 11, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
December 11, 2018
Rating:


No comments: