ग्राहकांना याबद्दल किमान माहिती तरी द्यायला हवीच असा ट्रायकडून सांगण्यात आलं आहे. जिओमुळे वाढलेल्या स्पर्धेचा परिणाम काही कंपन्या बंद होण्यात तर काही एकमेकांमध्ये विलीन होण्यात झाला आहे. आता एअरटेल, व्होडाफोन, आयडिया पैसे मिळवण्यासाठी असे नवे मार्ग शोधत असल्याचं दिसून येत आहे. मात्र याचा ग्राहकांनाच त्रास होत असल्याचं चित्र समोर आहे. ग्राहकांना रिचार्ज करणं बंधनकारक व्हावं इथपर्यंत प्रकरण आल्यावर ट्रायने ग्राहकांची सेवा बंद करण्याची कृती करण्यास विरोध केला आहे.
या प्रकरणात ग्राहकांना कमीतकमी ठराविक रकमेचा रिचार्ज बंधनकारक केला गेला आहे जेणेकरून कमी वापर किंवा कमी रकमेचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना अधिक रकमेचा रिचार्ज तोसुद्धा दरमहा करावाच लागेल! आता ट्रायच्या हस्तक्षेपामुळे तरी टेलिकॉम कंपन्यांना शहाणपण येईल ही अपेक्षा...
पुरेसा बॅलन्स नसला तरीही त्यांची सेवा खंडित करण्यात येऊ नये : ट्रायचा आदेश!
Reviewed by Sooraj Bagal
on
December 02, 2018
Rating:
No comments: